नरसी - परीस्थिती वर मात करत राज्य ऊत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन या विभागात दारूबंदी ईन्सपेक्टर या पदांची परीक्षा ऊत्तीर्ण झाल्याने शिवकुमार दिगांबर कांबळे यांचा नरसी येथे भव्य सत्कार करण्यात आला.
शिवकुमार कांबळे चोंडी ता.मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी आहेत. लहान आसतानाच त्यांचे वडील सोडुन गेले . कुटूंबाचे ओझे खांद्यावर पडल्याने कुटूंबाचा ऊदर निर्वाह चालवण्यासाठी त्यांनी नाईलाजाने एस. टी. महामंडळ मध्ये 9 वर्षे वाहक म्हनुन काम केले. लहानपणा पासूनच हुशार आसल्याने कांबळे यांचे मन एस.टी.महामंडळा मध्ये मन रमत नव्हते. ऊच्च आधिकारी व्हावे आसे त्यांना नेहमी वाटत आसे कुटूंबाची जिमेदारी स्वतःवर आसताना सुध्दा ऊच्च शिक्षणाची ओढ आसल्याने त्याने एस.टी.महामंडळातील नौकरीचा राजीनामा देवुन पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. जिद्दीने आभ्यास करून त्याने आज राज्य उत्पादन शुल्क, (दारूबंदी) महाराष्ट्र शासन या विभागात दुय्यम निरीक्षक पदाची परीक्षा ऊत्तिर्ण झाल्याने नरसी (ता.नायगाव जि.नांदेड) येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भास्कर भेदेकर मा.सरपंच दिगांबर कोकणे,धम्मा भेदेकर,नितीन भालेराव,संतोष कुडके,मंगेश भेदे, गंगाधर भेदेकर,खाजाभाई तांबोळी आदींनी सत्कार केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा