तब्बल दिड वर्ष प्रलंबित राहिलेल्या बिलोली नगर परिषदेच्या नवीन व्यापारी संकुलातील गाळ्या संदर्भात "व्यापारी संकुल कशासाठी ?" सुरू करण्यात आलेली चळवळ व तत्कालीन मुख्याधिकारी व न.पा ने केलेल्या पाठपुराव्यामुळे २१ सप्टेंबर २०१८ रोजी व्यापारी संकुलातील २८ गाळ्यांचा लिलाव करण्यात आला.या लिलावाबाबत व्यापारी संकुल कशासाठी ? गोविंद मुंडकर आणि सय्यद रियाज यांच्या या चळवळीमुळे मोठी प्रसिद्धी मिळाल्याने २१ रोजी च्या लिलावात एका गाळ्यासाठी सर्वात जास्त ११ लक्ष ३५ हजार रूपये तर सर्वात कमी ३ लक्ष ७५ हजार एवढी बोली लावण्यात आली होती.२८ गाळ्यांपैकी गाळा क्र.३ वगळता सर्व गाळ्याचा त्यावेळी लिलाव झाला होता.पण लिलावात भाग घेऊन २७ गाळ्यांची बोली लावणाऱ्यांपैकी १२ गाळांसाठी बोली लावलेल्यांनी मुद्दतीत अनामत रक्कम जमा केली नाही.त्यामुळे त्या १२ गाळ्यांचा दि.३० नोव्हेंबर रोजी फेर लिलाव करण्यात आला.पुर्वी झालेल्या लिलावातील १५ गाळ्यांचे ८२ लक्ष ९८ हजार एवढी रक्कम मिळालेली असताना १२ गाळ्यांच्या फेर लिलावातून ४७ लक्ष ८५ हजार येवढी म्हणजे पुर्वी पेक्षा जवळपास अर्धीच रक्कम न.पा स मिळणार आहे.विशेष म्हणजे गत वेळच्या लिलावात गाळा क्र.७ साठी ११ लक्ष ३५ हजार एवढी बोली लागली होती.माञ फेर लिलावात त्याच गाळ्यास ४ लक्ष ९० हजार एवढी बोली लागल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा