धर्माबाद येथील शेतकरी युवक संतोष साखरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती शिरीष भाऊ गोरठेकर तर व उद्घाटक म्हणून. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा भारतीय जनता पार्टीचे प्रबळ दावेदार बालाजी बच्चेवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्माबाद भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विजय डांगे शहराध्यक्ष रामेश्वर गंधअलवार कृउबास संचालक शिवराज पाटील मोकलीकर श्याम शेठ झंवर मारुती कागरू पस सदस्य. यश पाटील मंगनाळीकर राहुल ममदापूर कर आदीसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा नेते बालाजी बच्चेवार म्हणाले की युवकांनी कोणाची गुलामी लाचारी न करता समाजकारणात राजकारणात काम करत असताना स्वाभिमान कोणापुढे गहाण न ठेवता संघटित होऊन गोर गरिबांसाठी काम करावं अशा पद्धतीच्या आव्हान केले बालाजी बच्चेवार यावेळी म्हणाले की एका शेतकऱ्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना रक्तदाना सारख्या पवित्र शिबिराचं आयोजन करून संतोष साखरे यांनी युवकांपुढील चांगल्या पद्धतीचा आदर्श ठेवलाय धर्माबाद मध्ये आजपर्यंत जास्तीत जास्त 48 रक्तपिशव्या जमा झाल्याचं आपल्या प्रास्ताविकात संतोष साखरे यांनी नमूद केलेल्या चा धागा पकडून व संतोष साखरे यांनी 50 पिशव्या जमा करण्याचा संकल्प केला हा संकल्प निश्चितच गौरवास्पद वस्तुतः असल्याचेही बालाजी बच्चेवार यांनी नमूद केले राहुल ममदापूर कर यांनी बालाजी बच्चेवार बच्चेवार हे या विधानसभेचे नेतृत्व करतील अशा पद्धतीचे आपल्या भावना व्यक्त केल्या हा धागा पकडून बालाजी बच्चेवार यांनी निश्चितच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर संधी मिळाली तर माझ्या हातून गोरगरिबांची. व जो समाज विकासापासून उपेक्षित आहे वंचित आहे अशा समाजाची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न माझ्या कार्यकाळात करेल अशा पद्धतीचे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले
आजपर्यंत प्रस्थापितांनी फक्त युवकांचा वापर करून घेतला व भांडवलदारांनी पैशाच्या जोरावर सत्ता मिळवून सत्तेचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न केलाय असाही घणाघात बालाजी बच्चेवार यांनी कोणाचेही नाव न घेतला व्यक्त केला यावेळी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग उपस्थित होता शेवटी बालाजी बच्चेवार म्हणाले की सर्व युवकांना मी आव्हान करतो कि आपण गरिबांचा वाली बना आज गरिबांचा वाली कोणी नाहीये मी सुद्धा गेल्या सव्वीस वर्षापासून राजकारण करत असताना गोरगरिबांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणही तशाच पद्धतीचा प्रयत्न करावे काही अडचण असल्यास व मदत लागत असल्यास मी संपूर्णपणे मला सांगायला असेही बालाजी बच्चेवार म्हणाले हा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात व प्रेरणादायी युवकांना दिशा देणारा ठरल्याची चर्चा या ठिकाणी व्यक्त होत होती या कार्यक्रमामुळे धर्माबाद शहरात बालाजी बच्चेवार व शिरीष गोरठेकर यांच्या जोडीची चर्चा मात्र जोरदार चालू होती........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा