अबकी बार बालाजी बच्चेवार..... , प्रबळ दावेदार म्हणुन घेणार्यांना चांगलीच चपराक
नायगाव प्रतिनीधी :
नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी जनतेशी थेट संवाद साधत भेटीगाठी वर देत पुर्ण मतदार संघ पिंजुन काढण्याचा सपाटाच लावला याच दरम्यान नायगाव येथे गुरूवारी आठवडी बाजार भरला होता यावेळी बच्चेवार मिञमंडळांच्या वतीने बाजाराला आलेल्या लोकांना बाजार करण्यासाठी कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले प्रत्येकांच्या हातात बालाजी बच्चेवार यांच्याच पिशव्या दिसत होत्या यावेळी बालाजी बच्चेवारच नायगाव विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा माञ पुर्ण बाजारात रंगली होती
नायगावचा बाजार जिल्ह्यातच नव्हे तर पुर्ण मराठवाड्यात प्रसिध्द आहे येथे जिल्ह्याहूनच नव्हे तर परजिल्हातील मोठे व्यापारी व्यापारासाठी येतात यासह मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश,तेलंगाना,कर्नाटक या राज्यातील व्यापार्यांची नायगावच्या बाजाराशी साठगाठ असल्यामुळे परराज्यातील व्यापारी सुध्दा नायगावला येतात विशेष म्हणजे नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी जनतेशी थेट संवाद साधत मतदारसंघात भेटीगाठी वर जोर दिला व कठिण प्रस्थिथीत भाजपचा झेंडा हातात घेऊन काम केल्याचे सांगत आपला राजकिय ईतिहास मांडून मला विधानसभेत पाठवा जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असे सांगून आशिर्वाद मागत आहेत व वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातुन जनतेला भाजपाच्या विविध योजनेचे महत्व पटवून देत आहेत व जनतेचाही त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्याचाच एक भाग म्हणून बालाजी बच्चेवार यांनी पर्यावरण संतुलन लक्षात घेऊन नायगावच्या बाजारात आलेल्या लोकांना व व्यापार्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले यावेळी बाजारात फक्त बालाजी बच्चेवार यांचीच पिशवी दिसत होती जागोजागी लोकांचा घोळका जमलेला दिसत होता यावेळी अबकी बार बालाजी बच्चेवार... भावी आमदार बालाजी बच्चेवार होणार असून नायगाव विधानसभेचे प्रबळ दावेदार बच्चेवारच आहेत अशी चर्चा पुर्ण बाजारसह बाजारपेठेत रंगली विशेष म्हणजे भाजपातील काही मीच प्रबळ दावेदार म्हणून घेणार्यांना चांगलीच चपराक बसली हेही तेवढेच खरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा