बिलोली ( ता.प्र.) कंधार तालुक्यातील गांधीनगर येथील संस्थेने आश्रमशाळेतील लिपिकास कामावरुन कमी केले याविरोधात उच्च न्यायालयाने लिपिकास न्याय देऊनही नांदेड च्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी नियमबाह्य पणे अतिरीक्त ठरवुन इतर ठिकाणी केलेल्या समायोजना विरोधात लिपिक जयपाल राठोड हे दि.4 सप्टेंबर पासुन लातुर येथील समाज कल्याण उपायुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सद्या बिलोली तालुक्यातील विजयनगर ( दगडापुर ) येथील आश्रम शाळेत समायोजनेवर पदस्थापनेवर असलेले लिपिक पण मुळ गांधीनगर ता.कंधार येथील आश्रम शाळेत लिपिक होते.संस्थेनी सन 1993 ला राठोड यांना कामावरुन कमी केले याविरोधात राठोड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली ज्यामुळे राठोड यांना न्यायालयाने न्याय ही दिला .न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राठोड यांनी वारंवार संबंधित विभागाला तक्रारी ,अर्ज , निवेदने देऊनही काही उपयोग झाला नाही.इतकेच नाही तर नांदेड येथील समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्तांनी राठोड यांना नियमबाह्य पणे अतिरिक्त ठरवुन समायोजन केले आहे याशिवाय त्या आदेशाची योग्य अंमलबजावणी न करता राठोड यांच्यावर अन्याय केला आहे.याविरोधात आणि प्रमुख मागण्या घेऊन दि.4 सप्टेंबर पासुन लातुरात उपोषणाला बसणार आहेत. ज्यात योग्य वेतन मिळवुन देण्यात यावे , राठोड यांची सेवा दि.5 फेब्रुवारी 1989 पासुन सुरु झाली ते आजपर्यंत ते सेवा सातत्य देत असतांना त्यांना अतिरिक्त घोषित करुन संबंधीत विभागाने अन्याय केले . गांधीनगर येथील बी.एम.गोटमवाड यांच्या बदलीपासुन , राजीनामा दिल्यापासुन येथील लिपिकाचे पद रिक्त असतांना सुद्धा कनिष्ठ कर्मचा-यास तेथे नियमबाह्य आणुन अन्याय केला.राठोड यांच्या मुळ सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत अद्यापही अद्यावत करुन दिली नाही.दि.16 आॕगस्ट 2016ते 19 जुलै 2018 पर्यंत 32, 563 रु.जीपीएफ कपात करुनही खात्यात जमा न करता कोठे व का ठेवण्यात आली . जानेवारी 1990 ते 8जुलै 1993 या काळात राठोड यांच्या वेतनातुन कपात करण्यात आलेले जीपीएफ कोठे ठेवण्यात आली . राठोड यांच्या पेक्षा 10 वर्षाहुन अधिक कनिष्ठ असलेल्या कर्मचा-यास जागा रिक्त असतांना काम कसा काय करु शकतो ऊलट या कर्मचा-यापेक्षा 10वर्ष वरिष्ठ असणाऱ्या राठोड यांच्यावर अन्याय केला आहे.अशा मागण्या घेऊन जयपाल राठोड हे दि.4 सप्टेंबर पासुन लातुरच्या समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा