महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्याचा आनंद आहे असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
शिंदे म्हणाले की,भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांचे राज्यातील शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी ,युवक व आमचे नेते सदाभाऊ खोत व रयत क्रांती संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो पुढील कार्यास शुभेच्छा देतो.
नवीन सरकारने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकर घ्या ही अपेक्षा व्यक्त करतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा