अखेर कोविड केअर सेंटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी मंजूर करून त्यास इंटरनेटने जोडणीचे आदेश
बिलोली शासन लोकांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेत आहे हे कळण्यासाठी कोविंड केअर सेंटर मध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांनी केली होती ती तात्काळ मंजूर करण्यात आली त्यांचे आदेश मिळाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे.
कोविड केअर सेंटर मध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत रुग्ण कोणत्या अवस्थेत आहे . हे पाहण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मोबाईलवर मुभा असावी शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोविड केअर सेंटर मध्ये नेमकं काय चाललं आहे हे कळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. सरकार अब्जो रुपये खर्चून लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे तर प्रत्येक हॉलमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे ही फार मोठी खर्चाची बाब नाही. कोणते डॉक्टर कोणत्या रुग्णाला किती वेळ भेटले ? कोणत्या परिचारिका कोणत्या रुग्णांना किती वेळा भेटले आणि काय उपचार केला?याची इत्थंभूत माहिती यानिमित्ताने त्यांच्या रुग्णाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यासाठी उपयोगी असेल. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास प्रशासन किती प्रामाणिक काम केलंय हे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना कळविण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होईल आणि गैरसमज टाळल्या जातील. शासन आणि प्रशासन जनतेच्या हितासाठीच करत असल्यास पारदर्शक व्यवहारासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे काय गैर आहे? असा सवाल करून शासनाने तातडीने कोविड केअर सेंटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसावे अशी मागणी प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांनी मुख्यमंत्री ,आरोग्य मंत्री यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली होती याबाबतचे आदेश तात्काळ काढण्यात आले असले तरी ते गोविंद मुंडकर यांना नुकतेच प्राप्त झाले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा