आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू, अंतीम तारीख ३१ ऑगस्ट असल्याचे माहीती गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांनी दिली आहे
कुंडलवाडी ( मो.अफजल )
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया बिलोली तालुक्यातील शाळांमध्ये राबविण्यात येत आहे .तरी आरटीई कायदा मोफ्त व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अन्वय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अंतीम दि. ३१ ऑगस्ट 2020 आहे तरी ज्या शाळेत लॉटरी लागली आहे तेथे जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आव्हान गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांनी केले आहे.
दि.१७.३.२०२० रोजी सोडत ( लॉटरी ) नुसार ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागलेली आहे.अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे.यानंतर लॉटरी लागलेल्या कोणतेही बालकास प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद सर्व पालकांनी घ्यावी . त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये मधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे . म्हणून ज्या बालकांची लॉटरी लागलेली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व दोन छायांकित प्रती घेऊन ज्या शाळेत लॉटरी लागली आहे तेथे जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आव्हान गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांनी केले आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा