कुंडलवाडी प्रतिनिधी (मो.अफजल)
दि.23 ऑगस्ट रोजी रात्री 9=30 चा सुमारास शहरातील बस्थानक जवळील निर्मनुष्य जागेवर एक 25 वर्षी महिला पाच ते साहा तासापासून एकटीच बसल्यांची माहीती सपोउनी.विशाल सुर्यवंशी,पोका.दिलीप जाधव यांना कळताच ते त्या ठिकाणी पोहचले चौकशी केली असता सबंधी महिला गर्भवती असल्याचे व तीला प्रस्तुतीचे वेदना होत असल्याचे निदर्शनास आले.त्याच क्षणी सपोउनी.विशाल सुर्यवंशी पोका दिलीप जाधव सबंधीत महिलेला अॅटोत बसवून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले या ठिकाणी डाॅ.सातमवाड व त्यांचे आरोग्य कर्मचा-यांचा प्रत्नांने दि.24 ऑगस्ट पाहाटे 4=00 वा.सुखरूप प्रस्तुती होवून पुत्ररत्न जन्माला आले.वेळेवर उपचार व
पोलीसांचा सतर्कतेमुळे दोन जीव वाचले.यामुळे शहरात पोलीसांचा कार्याचे कौतूक केले जात आहे.कोरोना कळा नंतर शहरात पुन्हा एकदा खाकी वर्दीतील मानुसकीचे या निमित्त्याने दर्शन झाले.
याबात मिळालेली माहिती अशी की आनेश्वर डूमणे वय 27 रा.गागलेगाव ता.उमरी,पुजा आनेश्वर डूमने वय 25 रा.मुखेड.पुजा व आनेश्वर दोघे काही वर्षा पुर्वी प्रेमविवाह केले.आनेश्वर पुणा येथे खाजगी नौकरी करतो.दि.11 ऑगस्ट रोजी पुजाला मुखेड येथे सोडून गेला पण ती आपला माहेरी न जाता व आनेश्वर फोन न करता.11 ऑगस्ट पासून या गावा हून त्यागावी ईकडे बस्थानकात गर्भवती राहून बे वारस फिरत असे त्यास पद्धतीने ती कुंडलवाडी गाठली व शहरातील बस्थानक जवळील निर्मनुष्य जागेवर पाच ते साहा तासापासून एकटीच बसल्यांची माहीती सपोउनी.विशाल सुर्यवंशी यांना कळाली ते त्या ठिकाणी पोहचले चौकशी केली असता पुजा गर्भवती असल्याचे व तीला प्रस्तुतीचे वेदना होत असल्याचे निदर्शनास आले.त्याच क्षणी सपोउनी.विशाल सुर्यवंशी पोका दिलीप जाधव यांनी पुजाला आरोग्य केंद्रात नेले या ठिकाणी डाॅ. बालाजी सातमवाड व त्यांचे आरोग्य सेवीका सावंत,देवकांबळे,पडलवार,तहसीम बेगम यांच्या प्रत्नांने दि.24 ऑगस्ट पाहाटे 4=00 वा.सुखरूप प्रस्तुती होवून पुत्ररत्न जन्माला आले.वेळेवर उपचार व पोलीसांचा सतर्कतेमुळे दोन जीव वाचले.कोरोना कळा नंतर शहरात खाकी वर्दीतील मानुसकीचे पुन्हा एकदा या निमित्ताने दर्शन झाले.
तसेच आज सकाळी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी तालूका आरोग्य सुपरवायझर एच.आर.कटके यांच्या मदतीने उमरी तालूक्यातील गागलेगाव येथील
पुजेचा पती व सासरे व सासू यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावण्यात आले.सर्वांची समजूत काढून पुजेचा आरोग्याची विचारपूस करीत पुजा व त्याचा मुलास त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.यावेळी डाॅ.बालाजी सातमवाड,
सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी पुजा व त्यांचे पती,सासरे,सासू पत्रकार मोहम्मद अफजल उपस्थित होते.
एकंदरीत पुजा गेल्या 11 ऑगस्ट पासून दरदर फिरत होती.मुखेड पासून कुंडलवाडी गाठली.पुढे कुठे जारणार होती ?
23 ऑगस्ट रोजी खाकी वर्दीतील मानुस कुंडलवाडी सपोउनी.विशाल सुर्यवंशी पोका.दिलीप जाधव यांना रात्री 9=30 वाजता एकटीच सापडली.अन्यथा तीचे व त्याचा चिमुकल्या जीवाचे काय झाले असते विचार न केलेलेच बरे कारण गेल्या अनेक वर्षांपासून लगत असलेल्या गोदावरीत अनेक अकस्मित घटना घडले.कुंडलवाडी पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांने दोन जीवांना जीवन दान मिळाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा