कुंडलवाडी प्रतिनिधी (मो.अफजल)
कोरोना विषाणू प्रादुर्भाव ग्रामीण भागात दिवसे दिवस वाढतचालला असून कुंडलवाडी परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले अर्जापूर येथे एकाच कुटूंबातील दोन पुरूष दोन महिला अशा चार जनाचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्यामुळे गावात खळबळ उडाली
दि.24 ऑगस्ट रोजी अर्जापूर येथील एका परिवारातील मुलगा वडील,सासू,सून यांना सर्दी जुखाम मोठ्या प्रमाणात येत असल्याचे जानवत असल्याने त्यांनी केविड सेटर येथे आरोग्य तपासणी करून घेतली असता चारही जनाचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.
याकामी गावातील उपकेंद्रासह कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य यंत्रणा,कामाला लागली.रूग्ण राहात असलेली गल्ली काॅन्टेन्टमेन्ट झोन म्हणून जाहीर करून परीसर सील करण्यात आले व नागरीकास प्रवेश बंदी करण्यात आले आहे.तसेच यापुढे काॅन्टेन्टमेन्ट झोन मधील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड,अर्जापूर उपकेंद्रचे समुदाय वैद्यकीय अधिकारी डाॅ.साबळे स्वाती यांनी दिली.याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य साह्यक ए.एच मुंढे उपकेद्रातील आरोग्य सेवीका माळोदे एस.के,आशा रामटक्के,कांबळे परिश्रम घेत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा