कुंडलवाडी प्रतिनिधी ( मो.अफजल)
कुंडलवाडी पोलीस ठाणे हद्दित यावर्षी एकूण परवाना धारक 32 श्रीचे स्थापना करण्यात आले.यातील कुंडलवाडी शहरात 16 तर ग्रामीण भागात 18 श्रीचे स्थापना करण्यात आले तर यातील 16 गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आले आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाणे हद्दीत यावर्षी गणपती बाप्पा चे आगमन अगदी साध्या पद्धतीने झाले गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळ पासूनच शहरातील बाजारात नागरिकांची एकच गर्दी दिसून आली गणपती उत्सवावर या वर्षी कोरोना विषाणूचे सावट असल्याने ना ढोल ना मिरवणूक अगदी साध्यापणात गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले यावर्षी ग्रामीण भागात एक गाव एक गणपती हा उपक्रम मोठ्या पद्धतीने राबवित येत आहे.फक्त माचनूर याच गावी दोन श्री चे स्थापना करण्यात आले आहे.बाप्पाच्या आगमना निमित्त भक्तानी आपल्या घरी फुलांची सजावट करून बाप्पाचे स्वागत केले सर्वत्र कोरोनाचे सावट असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक गणेश मंडळाना कोरोनाचे नियम व अटी असल्यामुळे सर्व नियमाचे पालन करत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आले.कुंडलवाडी पोलीस ठाण्यातर्फे मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्यात आली अशी माहिती पोलीस डी.एस.बी चे गजानन अनमूलवार सागीतले.
शहरात यावर्षी अध्यक्ष निवासस्थानी उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांचा हस्ते व नगरसेवक पंढरी पुपलवार,अशोक पाटील खेळगे,सय्यारेड्डी पुपलवार,व्यंकट शिरामे,हणमंलू ईरलावार आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा