नांदेड - नेपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धा चे आयोजन स्पोर्ट्स स्टेडियम पोखरा नेपाळ येथे, नेपाळ युवा क्रीडा विकास परिषद व असोसिएशनल फॉर ट्रेडिशनल युथ गेम्स अँड स्पोर्ट इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंनी कबड्डी सिनियर या प्रकारात सहभाग घेऊन रौप्य पदक प्राप्त केले त्यामध्ये संयुक्ता देबाजे, अंकिता भालेराव,सीमा देशमुख,मोहिनी बरुरे, प्रज्ञा लोखंडे, रितिका कांबळे ई.खेळाडूंनी रौप्य पदक संपादन केले,याच खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर सुपर्ण पदक प्राप्त केले होते.या स्पर्धेत भारत,नेपाळ, भूतान, श्रीलंका आदी देशांनी सहभाग घेतला होता.
न्यू फोर्स अकॅडमी नांदेड चे संचालक शेख सर याच्या वतीने विजेत्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बोरीकर सर (सायन्स कॉलेज स्पोर्ट्स डायरेक्टर ),राजकुमार मराठे सर,अशोक तोंडे सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले
यांच्या या यशाबद्दल सर्वांनी शुभेच्छा चा वर्षाव केला त्या मधे महत्वाचं योगदान म्हणजे त्याचे प्रशिक्षक सूर्यकांत ताडेवार (नायब तहसिलदार) यांचं होत
अविनाश जाधव पळसगावकर (ग्रा. पं. सदस्य पसळगाव तथा ता कार्याध्यक्ष ओ बी सी सेल उमरी) यांच्या सह अनेक जन उपस्थित होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा