कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या स्थानिक आमदार विकास कार्यक्रम वर्ष 2020/21 अंतर्गत बिलोली ग्रामीण रूग्णालयात रूग्ण वाहिकेचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर हे होते तर उद्घाटक म्हणून वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर अजित गोपछडे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, वैद्यकीय अधीक्षक नागेश लखमावाड, शिवराज पाटील आदींची विशेष उपस्थिती होती.
बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्ण वाहिका आणि पंचवीस खाटा ची गरज असल्याची बाब बिलोली शहर विकास कृती समितीने आमदार राम पाटील रातोळीकर यांच्याकडे विषद केली होती.याबाबत कृती समितीचे सुभाष पवार आणि गोविंद मुंडकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता .सात महिन्यापूर्वी केलेली मागणी नुकतीच पूर्ण झाली.रूग्ण वाहिकेचे शुभारंभ दि. 31 ऑक्टोबर 2020 रोजी ग्रामीण रूग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी वाहान चालक चालक महेश हळीखेडे याचा डॉक्टर अजित गोपछडे यांनी सत्कार केला.डॉक्टर अजित गोपछडे यांनी उद्घाटनपर भाषण प्रभावीरीत्या केले तर अध्यक्षीय समारोप रंजकपणे व्यंकटराव गोजेगावकर यांनी केले,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नागेश लखमावाड यांनी आमदार राम पाटील रातोळीकरचे आभार व्यक्त केले आणि
कृती समितीची मागणी आणि पाठपुरावा या विषयी विश्लेषण करत वीज अखंडीत राहण्यासाठी जनरेटरची मागणी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात केली.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिवाजी पांडागळे यांनी केले तर आभार श्रीनिवास नरवाडे यांनी व्यक्त केले.यावेळी
उमाकांतराव गोपछडे,अनंदराव बिराजदार सरचिटनीस श्रीनीवास पा.नरवाडे,इंद्रजीत तुडमे,दतराम बोधने,शांतेश्वर पाटील,
बळवंत पाटील,अबाराव संगनोड,दगडे पाटील
मोहन ,विजय कुंचनवार,गोविंद मुडकर,गंगाधरराव नरवाडे,माजीसरपंच परसुरे मारोती राहीरे,शैलेष पाटील पांडागळे,
राजकुमार गादगे,महींद्र तुकडे इत्यादीसह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्, पत्रकार, नागरिक,आरोग्य कर्मचारी, मोठ्या संख्येने हजर होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा