बिलोली शहरातील उपेक्षितांच्या वस्तीत जाऊन अंधाऱ्या घरात दिवे लावण्याचा उपक्रम नेहमीप्रमाणे या वर्षीही करण्यात आला.
विगत अनेक वर्षापासून उपेक्षितांच्या घरात दिवा लावून दिवाळी साजरा करण्याचा उपक्रम बिलोली येथे स्वयंस्फूर्तीने केला जातो. या उपक्रमात सर्व जाती धर्मातील सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे व्यक्ती सहभागी होतात. यावर्षीही उपेक्षित आणि अंधाऱ्या घरात दिवे लावण्याचा उपक्रम सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून केला. यात बिलोली येथील गोविंद मुंडकर, बालाजी गेंदेवाड, यांच्या पुढाकाराने श्री राम शिवापनोर, श्रीमान कोंडलवाडे, रियाज सय्यद, बसवंत मुंडकर, गागीलगे, कसलोड, वैभव आणि अमोल गेंडेवाड यांच्या परिश्रमाने हा उपक्रम यशस्वी झाला. या उपक्रमात शहरातील विविध जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा