बिलोली
येथील पोलिस ठाण्यात कार्यरत ३ पोलिस हेड काँन्सटेबल,३ नायक पोलिस काँन्सटेबल तर एक पोलिस काँन्सटेबल यांना पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वे बढती देण्यात आली.
नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बढती बाबत काढलेल्या आदेशानुसार बिलोली पोलिस ठान्यातील हेड काँन्सटेबल जनार्दन बोधने यांना सहाय्यक पोलिस उप निरिक्षक ,हेड काँन्सटेबल शाहू रघुविर सिंह यांना सहाय्यक पोलिस उप निरिक्षक,हेड काँन्टेबल शेख महेबुब यांना सहाय्यक पोलिस उप निरिक्षक या पदावर बढती देण्यात आली.तर नायक पोलिस काँन्सटेबल लक्ष्मण सोनकांबळे,दुर्गाजी पाटील व गोविंद शिंदे यांना पोलिस हेड काँन्सटेबल या पदावर बढती देण्यात आली.भगवान कोत्तापले यांना पोलिस काँन्सटेबल पदावरून नायक पोलिस काँन्सटेबल या पदावर पढती करण्यात आली.पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वे करण्यात आलेल्या या बढती बद्दल पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या हस्ते बढती झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलिस उप निरिक्षक एस.पी गंगापुरकर, पो.उप निरिक्षक खेडकर यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा