बिलोली ( सय्यद रियाज )
तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळा आज घडीला डिजीटल झालेल्या आहेत.ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दुरावस्था होऊन विद्यार्थी संख्या झपाट्याने घटत आहे.बिलोली शहरातील भव्य इमारत व क्रिडांगण असलेल्या जिल्हा परिषद हायस्कुल शाळेला पुन्हा अच्छे दिन मिळवून देण्यासाठी लवकरच बिलोली येथे शिक्षण तज्ञांची बैठक घेऊन शाळेला पुन्हा उभारी येण्यासाठी त्यांच्या सुचनेनुसार अडचणी सोडविणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष साबणे यांनी केले.
शासनाकडून शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडे गेल्या काही वर्षापासून होत असलेल्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळा अखेरच्या घटीका मोजत आहेत.कुंडलवाडी मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कुल शाळेचीही अशीच दुरावस्था झाली असून काही वर्षापुर्वी या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांना शाळेच्या चकरा माराव्या लागत असत.तब्बल दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या या शाळेकडे कालांतराने झालेले दुर्लक्ष आणी वरचेवर वाढणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थांमुळे जिल्हा परिषद हायस्कुल शाळेतील विद्यार्थी संख्येत लक्षणिय घट झाली.बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेस गत वैभव मिळवून देण्यासाठी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी चळवळ सुरू केली असून शाळेत पुर्वपदावर आणण्यासाठी शासन स्तरावर मदत मिळावी यासाठी या चळवळीतील सहभागदारांनी आ.साबणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले माझे शिक्षणही जिल्हा परिषद शाळेत झाले असून खाजगी शिक्षण संस्थांच्या मानाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण व सवलती अधिक चांगल्या आहेत.माञ मध्यंतरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या तुलनेत शहरी भागातील शाळांकडे दुर्लक्ष झाले हे खरे आहे.बिलोली शहरातील जि.प हायस्कुल शाळेला अच्छे दिन आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असून लवकर बिलोली येथील शिक्षण तज्ञांची बैठक घेऊन त्यांनी सुचवलेल्या सुचना व येणाऱ्या अडचणी राज्याच्या शिक्षण मंञ्यांकडे मांडणार असल्याचे आ.सुभाष साबणे यांनी अश्वासन दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा