२४ जून २०१९

जागर फाऊंडेशनच्या वतीने बार्शी येथे मोफत करियर मार्गदर्शन शिबीर व आंतरराष्ट्रीय योगदिन



संख :  सोलापूर येथील नेहरू युवा केंद्र व जागर फाऊंडेशन बावी आ (ता बार्शी, जि सोलापूर)यांच्या संयुक्त विद्यमानेडोझरी (ता जत) येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांना "जागर वनश्री" पुरस्कार उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप यांच्या हस्ते प्रशस्तीपञ व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम बार्शी येथे झाला.

     पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती  शाळेत 69 वृक्षाची लागण केली आहे.उन्हाळात विद्यार्थी, पालक व पर्यावरण प्रेमीच्या मदतीने टॅकरने पाणी घालून संर्वधन व संगोपन केले आहे. वृक्ष लागवड वन संवर्धनाच्या माध्यमातून समाज व वसुंधरेच्या कल्याणार्थ पर्यावरण व तत्संबंधी जनजागृती वनराई फुलवून शाळा परिसर हिरवागार केला आहे या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड केली आहे.

  मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी मनोगतात शाळेची वनराईचं व प्रगती ग्रामस्थ,पालक,शालेय व्यवस्थापन समिती यांच्या सांघिक प्रयत्नातून झाल्याचे सांगितले.

       कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश घोलप म्हणाले की, विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाबरोबरच नीती मूल्यांचे माणूस बनवणारे शिक्षण मिळणे गरजेचे आहे.

   यावेळी 'दहावी बारावी नंतर पुढे काय' या विषयावर अमोल कुलकर्णी यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जाणीवा व उणीवा ओळखून वाटचाल करावी.कठोर परीश्रम, ध्येयाप्रतीचा ध्यास व सकारात्मक दृष्टिकोन हीच यशाची त्रिसूत्री आहे.आवङ व छंदालाच आपले ध्येय मानून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे.

    योगगुरू अनिल वेदपाठक यांनी प्रणायम व आसने योगसाधनेचे महत्त्व सांगितले.

यावेळी बारावी कला शाखेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थीनी दिव्या किशोर रसाळ, शितल बालाजी आगलावे, अमृता शंकर ङोईफोङे, धनश्री विठ्ठल आगलावे, प्रतिक्षा कुमार करङे, सुनिल नाना मिठे या गुणवंताचा सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमास प्रमुख उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप, सचिन वायकुळे, गणेश गोडसे ,नगरसेवक मदन गव्हाणे, जागर फाऊडेशनचे विशाल चिपडे, अस्मिता चिपडे, महादेव कोकरे, अनिल वेदपाठक, मुकेश भोरे, राहुल गायकवाड विठ्ठल आगलावे, बालाजी आगलावे, शंकर ङोईफोडे,कुमार करडे,सोजर इंग्लिश मेङियम स्कूलचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

      सूत्रसंचालन विशाल चिपङे यांनी केले तर आभार अस्मिता चिपडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...