उमरी:- उमरी येथील प्रतिष्ठित व्यापारी व पद्मशाली समाजाचे जैष्ठ कार्यकर्ते बालाजी टिप्रेसवार यांच्या मातोश्री शशीकलाबाई पोशट्टी टिप्रेसवार वय ९८ वर्षे यांची दि. २८ मार्च रोजी कोरोना अँन्टीजन तपासणी करण्यात आली असता त्यांच्या अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला होता.
त्यावेळेस त्यांना अंगदुखी, ताप व श्वास घेण्यास त्रास होत होता.
त्यामुळे त्यांना उमरी येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले व उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या ऑक्सिजन लेव्हल ८०-८५ दरम्यान होता. डॉ शंकर चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, डॉ हनमंत चव्हाण, डॉ सावळे, चंद्रप्रकाश चन्ना ग्रामीण रुग्णालय उमरी यांनी सांगितले की, १-२ दिवस पाहूया तब्येत फारच गंभीर झाली तर नांदेड येथे रेफर करु या पण तब्येत मध्ये सुधारणा होत गेली त्यांचे नात संदिप व महेश टिप्रेसवार हे त्यांच्या आजीची देखरेख करतच होते व आज दि. ८ एप्रिल रोजी घरी पाठविण्यात आले.
कोरोना लसीकरण चा एक डोस दि. ५ मार्च रोजी त्यांनी अगोदर घेतला होता त्यामुळे त्यांच्या तब्येत मध्ये सुधारणा होत गेली अशी माहिती सत्यजीत टिप्रेसवार यांनी दिली.
कोरोनावर मात करण्यासाठी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, घाबरून जाऊ नका, वेळेत उपचार घ्यावे तसेच कोरोना लसीकरण करुन घ्यावे असे कोरोना वर मात करून आलेले शशीकलाबाई टिप्रेसवार यांनी सांगितले.
उमरी कोविड केअर सेंटर येथील प्रमुख चंद्रप्रकाश चन्ना हे रुग्णाचे मनौधर्य व जवळीक निर्माण करून रुग्णास आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात.
नांदेड येथे रेफर करावयाची वेळ आली तर बेडची व्यवस्था डॉ निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ पी.टी.जमदाडे साहेब व माधव शिंदे यांनी करून दिली होती.
उमरी कोविड केअर सेंटर येथील पल्लवी भालेराव, माधवी लांडगे, राजश्री वाघमारे, वर्षा गवाले,कोमल राठोड, लक्ष्मी नव्हाते, पाटे, शेख नवाज, अनिल मारावार, माधव शिंदे, रमेश पांचाळ यांनी योग्य ती सेवा देत आजीबाईंना सुखरूप होण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना ईश्वराने साथ देत आजीबाई आज आपल्या स्वगृही परतल्या त्यांच्या घरी येण्याने सर्व टिप्रेसवार परिवार अतिशय आनंदात हर्ष उल्हासात स्वागत केले आजीबाईने कोरोना काळात कसल्याही प्रकारे न घाबरता खंबीरपणे योग्य तो औषधोपचार घेत कोरोनावर मात करून सर्व उमरी वासियांसाठी आदर्श
निर्माण केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा