भोकर - आज दि. १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिना निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला.
फ्लॉरोन्स नाइटिंगेल परिचारिका यांच्या प्रतिमेस डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी पुष्षहार अर्पण केले. श्रीमती वैशाली कुलकर्णी अधिपरिचारीका यांनी प्रतिज्ञा वाचन केली व सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
यावेळी डॉ नितीन कळसकर, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण, राजश्री ब्राम्हणे, प्रियंका बक्केवाड, दिवटे, संगिता पंदिलवाड, मुक्ता गुट्टे, वर्षा राऊत परिचारिका, विठ्ठल शेळके, संदिप ठाकूर, मल्हार मोरे औषध निर्माण अधिकारी,पांडुरंग तम्मलवाड आरोग्य कर्मचारी, सुधाकर गंगातीर आरोग्य मित्र,बबलू चरण आदी कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा