मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हदगाव व हिमायतनगर तालुक्यात जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील पथकाने दिल्या भेटी

नांदेड :- सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. डासो उत्पत्ती स्थाना मध्ये वाढ झाली आहे. डेंग्यू व तापीच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे.  दि.२९ जुलै रोजी जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील पथकाने हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हदगाव, हिमायतनगर, प्राथमिक आरोग्य केंद्र बरडशेवाळा,आष्टी येथे भेट देऊन वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन हिवताप रक्त नमुने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कमी असलेल्या कर्मचारी यांना माहिती दिली. सदरिल गावामध्ये किटकशास्रीय सर्वैक्षण, कंटेनर सर्वेक्षण व अबेटिंग करण्यात आले.  डेंग्यू या आजाराविषयी नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्यात यावा. कोरड्या दिवसाचे महत्त्व सांगितले. प्रत्येकांनी आपल्या घरातील सांडपाणी यांचे आठवडायातून एक दिवस दर शनिवारी सर्व पाण्याचे साठे घासूनपूसून कोरडे करावे. त्यामुळे डेंग्यू आजाराच्या डासांची पैदास होणार नाही. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा नाली,मोरी वाहती करावी डबक्या पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशी माहिती दिली.  जिल्हा हिवताप क...

हत्तीरोग मोहीमचे नायगांव व बिलोली तालुक्यात राज्यस्तरीय प्रमुख डॉ संजीवकुमार जाधव यांनी केली पाहणी

  नायगांव :- नांदेड जिल्ह्यात हत्तीरोग एक दिवसीय औषधोपचार मोहीम (एमडीए) दि.१ जुलै ते १५ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. डिईसी व अल्बेंडाझॉल गोळ्या वयोगटानुसार आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, आशा व स्वंयसेवक यांच्या मार्फत घरोघरी फिरून सर्वांना समक्ष सेवन करण्यात येत आहेत. दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता, अतिगंभीर आजारी व्यक्ती यांना गोळ्या देण्यात येत नाहीत.  आज दि.१५ जुलै हत्तीरोग राज्यस्तरीय प्रमुख डॉ संजीवकुमार जाधव सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे यांनी नांदेड येथे सकाळी डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड व डॉ बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांची भेट घेऊन एमडीए मोहीम चा आढावा घेतला गोळ्या सेवनाचे प्रमाण बाबत चर्चा केली. जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यक (हत्तीरोग) यांची बैठक घेऊन सर्वांना एमडीए मोहीम चा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.  हत्तीरोग एक दिवसीय औषधोपचार मोहीम पाहणी करताडॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड व सत्यजीत टिप्रेसवार जि...

हत्तीरोग मोहिम तरोडा (बु) भागात डॉ संजीव ढगे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हि) लातूर यांनी पाहणी केली

नांदेड :- हत्तीरोग एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम (MDA) नांदेड जिल्ह्यातील दि. १ जुलै ते दि. १५ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात अनुक्रमे, सिडको, कंधार, तरोडा या ठिकाणी १ जुलै, ५ जुलै आणि दि.७ जुलै रोजी नांदेड जिल्हा नोडल अधिकारी डॉ संजय ढगे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर यांनी भेटी दिल्या डिईसी व अँल्बेंडाझॉल गोळ्या कर्मचारी यांच्या समक्ष वयोगटानुसार गोळ्या खाण्यात आले किंवा कसे याची खात्री करण्यासाठी प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांनी गोळ्या सेवन केले आहेत. याची पाहणी केली. आणि हत्तीरोग या आजारा विषयी माहिती दिली व कर्मचा-यांना आवश्यक त्या सुचना केल्या.  यावेळी डॉ.आकाश देशमुख, जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, सचिन कुलकर्णी आरोग्य सहाय्यक, अखिल कुलकर्णी किटक समाहारक सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) कार्यालय लातूर, गणेश सातपुते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, माधव कोल्हे आरोग्य सहाय्यक, जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड,गणेश भुस्सा आरोग्य सहाय्यक नांदेड महानगरपालिका, कार्यक्षेत्रातील कर्मचारी बालाजी निलपत्...

बिलोलीत अभिजीत तुडमे मिञमंडळाच्या वतीने मंगेश कदम यांचा वाढदिवस साजरा

   शहरातील नविन बस्थानक येथे देगलुर - बिलोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार मंगेश  कदम यांचा वाढदिवस साजरा या वेळी अभीजीत तुडमे ,गंगाधर पुपूलवार, महेंद्र गायकवाड , सुनिल, भास्करे,इंद्रजीत तुडमे, समाधान , बंडु जाधव , मिलींद पटाईत,सुनिल फालके,गोविंद गुडमलवार,रवि कल्यानकर,प्रविन सुर्यवंशी मंगेश खतागावकर,डोणगावे राजेश ,शिवा अप्पा ,साईनाथ शिरोळे,प्रशांत गादगे ,रंजित भोजेराव,  रतन जाधव ,शिवा स्वामी अदि उपस्थित होते