नांदेड :- हत्तीरोग एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम (MDA) नांदेड जिल्ह्यातील दि. १ जुलै ते दि. १५ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात अनुक्रमे, सिडको, कंधार, तरोडा या ठिकाणी १ जुलै, ५ जुलै आणि दि.७ जुलै रोजी नांदेड जिल्हा नोडल अधिकारी डॉ संजय ढगे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर यांनी भेटी दिल्या डिईसी व अँल्बेंडाझॉल गोळ्या कर्मचारी यांच्या समक्ष वयोगटानुसार गोळ्या खाण्यात आले किंवा कसे याची खात्री करण्यासाठी प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांनी गोळ्या सेवन केले आहेत. याची पाहणी केली. आणि हत्तीरोग या आजारा विषयी माहिती दिली व कर्मचा-यांना आवश्यक त्या सुचना केल्या.
यावेळी डॉ.आकाश देशमुख, जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, सचिन कुलकर्णी आरोग्य सहाय्यक, अखिल कुलकर्णी किटक समाहारक सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) कार्यालय लातूर, गणेश सातपुते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, माधव कोल्हे आरोग्य सहाय्यक, जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड,गणेश भुस्सा आरोग्य सहाय्यक नांदेड महानगरपालिका, कार्यक्षेत्रातील कर्मचारी बालाजी निलपत्रेवार, सुरेश आरगुलवार आरोग्य सहाय्यक सिडको, बालाजी आळणे आरोग्य सहाय्यक, दत्ता वळसिंगे आरोग्य कर्मचारी तरोडा (बु), आरोग्य सेविका,आशा कार्यकर्ती, स्वंयसेवक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा