नायगांव :- नांदेड जिल्ह्यात हत्तीरोग एक दिवसीय औषधोपचार मोहीम (एमडीए) दि.१ जुलै ते १५ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. डिईसी व अल्बेंडाझॉल गोळ्या वयोगटानुसार आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, आशा व स्वंयसेवक यांच्या मार्फत घरोघरी फिरून सर्वांना समक्ष सेवन करण्यात येत आहेत. दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता, अतिगंभीर आजारी व्यक्ती यांना गोळ्या देण्यात येत नाहीत.
आज दि.१५ जुलै हत्तीरोग राज्यस्तरीय प्रमुख डॉ संजीवकुमार जाधव सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे यांनी नांदेड येथे सकाळी डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड व डॉ बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांची भेट घेऊन एमडीए मोहीम चा आढावा घेतला गोळ्या सेवनाचे प्रमाण बाबत चर्चा केली. जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यक (हत्तीरोग) यांची बैठक घेऊन सर्वांना एमडीए मोहीम चा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.
हत्तीरोग एक दिवसीय औषधोपचार मोहीम पाहणी करताडॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड व सत्यजीत टिप्रेसवार जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक यांनी नायगांव व बिलोली तालुक्यातील गावातील भेट देण्यात आले. बिलोली तालुक्यात हिप्परगाव माळ येथे भेट देऊन गावातील नागरिकांनी गोळ्या सेवन केले आहेत का ? रँन्डमली घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.यावर्षी कोविड-१९ च्या अनुषंगाने वाटी पध्दती द्वारे गोळ्या सेवन करण्यात आले याची पाहणी केली. श्रीमती सोंडारे आशा, श्री बेटराज आरोग्य सहाय्यक, श्री वाघमारे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
नायगांव तालुक्यात मरवाळी येथे भेट दिली. गावातील हत्तीरोग दुषीत रुग्ण यांना प्रत्यक्ष भेट दिली व गोळ्या नियमित सेवन करतात का याची पाहणी केली. गावामध्ये फिरुन गोळ्या सेवन केले आहेत का याची पाहणी केली. नागरिकांना गोळ्या सेवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. डॉ श्रीनिवास बोरकर वैद्यकीय अधिकारी प्राआकेंद्र मांजरम, दामोदर मुंडे आरोग्य पर्यवेक्षक, जि.ए.अंजनीकर आरोग्य सहाय्यक,हनुमंत कोलगतराम आरोग्य कर्मचारी, हत्तीरोग नियंत्रण उपपथक नायगांवचे देविदास पेंढारकर, विजय सापनर, शेख नवाज क्षेत्र कर्मचारी,ए.जी.जाधव, आशा व प्राआकेंद्र चे कर्मचारी उपस्थित होते.
प्राआकेंद्र मांजरम येथे भेट देऊन आरोग्य सेविका व आशा स्वंयसेविका यांना गोळ्या सेवनाचे प्रमाण वाढविण्याबाबत माहीती दिली व त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या व माहिती दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा