१२ नोव्हेंबर २०१८

सुनिल जेठे यांची BRSP च्या बिलोली -देगलूर विद्यानसभा अध्यक्ष पदी निवड

नांदेड/बिलोली  
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नांदेड लोकसभा जिल्हा अध्यक्ष सुनिल सोनसळे यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतेच  नादेड येथील शासकीय  विश्राम गृहात बैठक घेण्यात आली.येत्या २०१९ लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष्याचे काम गतिमान करण्यासाठी   तसेच कार्यकर्त्यांना पक्षाच्या विविध धोरणे समजावून सांगण्यासाठी  (BRSP )बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या संस्थापक मा. अॅड.डॉ. सुरेश माने यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य संयोजक मा.सर्वजित बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील पदाधिका-यांची निवड करण्यात आली.यात देगलूर- बिलोली विधानसभा अध्यक्ष म्हणून  सुनिल पिराजी जेठे यांची निवड करण्यात आली.तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रकाश फुगारे पदभार देण्यात आले असुन बिलोली शहर अध्यक्ष भास्कर कुडके  यांची निवड केली आहे. या वेळी  नांदेड जिल्हा लोकसभा प्रभारी अरुण सोनटक्के, मिलिंद वाघमारे,बुध्दे विठ्ठल,शिवहार इंगळे,बंटी कांबळे,शेख फारुख,रवि हाडसे उपस्थित होते.या निवडी बद्दल बिलोली तालुक्यात कार्यकर्ते व मिञ मंडळापैकी सामाजीक कार्यकर्ता मुन्ना पोवाडे, प्रा.मोसिन खाॕन, रायलवाड,प्रविण
सोनकांबळे,पिराजी भडारे बडूरकर,माणिक कुडकेकर,सोमनाथ कुडके,शंकर अंबेकर,
संजयकूमार बिलोलीकर,गिरीधर दावलवार,अभिनंदन शेरे, रवि बनसी,देविदास कोंडलाडे,पञकार  यादव लोकडे,राजू बाबळीकर, बस्वराज वाघमारे, प्रल्हाद भालेराव,एल.पी.गोणेकर,सय्यद रियाज,गणेश गिरगावकर, सोनकांबळे विजय, व्यंकटराव जेठाळकर,आदी जनांनी अभिनंदन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...