फटाके मुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज - कमलाकर जमदडे
बिलोली प्रतिनिधी :
एकीकडे फटाक्यांनी भरून वाहणारी दुकाने आणी दुसरीकडे कर्णकर्कश आवाजाने वाढणारी अस्वस्थता व पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास ह्या धर्तीवर पर्यावरण प्रेमी नागरिक व संस्थाद्वारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे.ह्यासाठी जिल्हाभरात परिचित असणारे अंधश्रद्धा निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य तालुका बिलोली जिल्हा नांदेड चे माजी प्रधान सचिव व समर्पित कार्यकर्ते कमलाकर जमदडे यांनी गावोगावी स्वखर्चाचे हजारो रुपये खर्चून फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन करित पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक असल्याचा संदेश देत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने समाजकार्य करणाऱ्या च्या यादीत कमलाकर जमदडे यांचे स्थान विशिष्ट आहे. त्यांच्या ह्याच अंगाने अखंड सेवारत असलेल्या उपक्रमामुळे हिवाळ्यात गोर गरिबांना निराधार लोकांना वस्त्र वाटप, लोक सहभागातून वाचनालयाची स्थापना,विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,मुलीचा वाढदिवस कधी स्मशान भूमीत करणे तर कधी रुग्णाच्या समक्ष दवाखान्यात साजरा करणे तसेच जादूटोना विरोधी कायद्याचा जिल्हाभरात प्रचार प्रसार करण्याचे अखंड सेवाकार्य पाहून त्यांना
अंधश्रध्दा निर्मूलन व समाजकार्य क्षेत्रात करण्यात आलेल्या दैदिप्यमान कार्याची दखल घेऊन अंबाई बहुउद्देशिय सेवाभावी संस्था ( AIMS ) लातूर व्दारा अत्यंत सन्मानाचा २०१८ चा राज्यस्तरीय "जनसेवा पुरस्कार " , बहुजन टायगर सेना या सामाजिक संघटनेकडून समाजभूषण पुरस्कार,मानव विकास प्रतिष्ठाण तर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार,रेड क्रॉस सोसायटी नांदेड कडून उत्कृष्ट रक्तदाते पुरस्कार या बहुरूपी पुरस्काराने यापूर्वी त्याना गौरविण्यात आले होते.
पर्यावरण संरक्षण व संवर्धन ची आजची दुर्गती पाहता फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हा एक छोटासाच का होईना पण सकारात्मक पाऊल असेल हे नक्की..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा