११ ऑगस्ट २०१९

रेल्वेचे पोहण्याचा तलाव केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे -खा. प्रताप पाटील चिखलीकर



नांदेड-  रेल्वे विभाग आणि केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य आणि लक्ष घालून विद्यार्थी आणि पालकांसाठी रेल्वेचे स्विमिंग टँक उपलब्ध करून देण्यात यावे अशी सूचना विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गोविंद  मुंडकर यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे याविषयी मागणी केली होती. काल शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय विद्यालय याचे उद्घाटन झाले. यावेळी जाहीर कार्यक्रमात संबंधितांना सूचना करण्यात आल्या.चिखलीकर पुढे म्हणाले की विद्यार्थी  संपूर्ण देशामध्ये नावलौकिक करतील असे शिक्षण देण्यात यावे. या कार्यक्रमाला रेल्वेचे अधिकारी केंद्रीय विद्यालयाच्या अधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे चैतन्य बापू देशमुख , संजय कौडगे  यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...