११ ऑगस्ट २०१९

कोंडलापूर येथे आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी



बिलोलीः ता.प्र
बिलोली  शहरापासुन जवळच असलेल्या मौ. कोंडलापुर येथे  साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ  साठे यांची 99 वी जयंती साजरी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  वंचित बहुजण आघाडी चे तरुण तडफदार नेते मा.रामचंद्र भरांडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख  पाहुने म्हणुन इंद्रजीत तुडमे, रावसाहेब पवार, नागोराव नामेवार, पञकार राजेंद्र कांबळे , प्रकाश पोवाडे, यादव लोकडे , संजय पोवाडे , सुनिल कदम, सामाजिक  कार्यकर्ते मुन्नाभाऊ पोवाडे , सचिन वाघमारे, संदिप कटारे, मार्तंड जेठे ,  नगरसेवक निवृती पोवाडे, मारोती सिलगिरे, यांची प्रमुख उपस्थिती होती .
 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. 11 आॕगस्ट रोजी कोंडलापूर येथे साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे , डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , छञपती शिवाजी महाराज , वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन  करून माजी सरपंच सिद्राम पा. जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ,तद्नंतर
  स्वागत व सत्कार समारंभ  सोहळ्यात  जयंती मंडळाच्या वतीने  आलेल्या पाहुण्याचे सत्कार करण्यात आले . यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या जिवण चरिञावर इंद्रजित तुडमे,  रावसाहेब पवार, नागोराव नामेवार, मुन्नाभाऊ पोवाडे , यांनी आपआपले  विचार मांडले तर
अध्यक्षिय भाषन समारोपात  मा. रामचंद्र भरांडे यांनी  असे म्हणाले की या देशातली शासन व्यवस्था संघाच्या आदेशावरुन चालते म्हणुनच  परिवर्तनवादी महापुरुषाची विंटबना करुन जातीय दंगली घडविण्याचे काम करुन गुन्हेगार वाढविण्याचे कारखाणे तयार करणा-या व्यवस्थेला धडा देण्यासाठी वंचित बहुजण आघाडीशी नाळ जोडुण सत्तासंपादन करुन समाजाचं परिवर्तन करणे  गर्जेच आहे.  असे  प्रभोधनात्मक विचार मांडले आहेत. शंकर पा. कदम, सिध्दार्थ लाखे, अॕड. रमेश जाधव,ग्रा.प. सदस्य बळीराम पा. कूंकनोर,  गणेश कदम, मारोती जाधव, चक्रधर टेकाळे धोंडिबा आंबेकर , सुदाम गायकवाडसह महिला व पुरूषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
 जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी
चंद्रकांत आंबेकर , सुनिल एडके ,  सुनील शेळके, जयंती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण अंबेकर, नागनाथ अंबेकर, चंद्रकांत कुडके, किशन गायकवाड , शेख शारूख, अतुल गायकवाड , कपील शेवके, राजू अंबेकर यांनी तर या कार्यक्रमाचे सुञसंचलन पञकार मुकींदर कुडके यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...