बिलोली ( ता.प्र) बिलोली तालूक्यातील मौजे कासराळी येथील भारत निर्माण कार्यक्रम पाणी पुरवटा योजनेतील 75 लाखाच्या भ्रष्टाचार प्रकरणी विशेष पोलीस महानिरिक्षक परिक्षेञ कार्यालय नांदेड येथे 15 अॉगस्ट 2019 रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संग्राम विठ्ठलराव हायगले हे अमरण उपोषन करण्यात येणार आहे.
भारत निर्माण पेयजल योजनेत 75 लाखाच्या भ्रष्टाचार झाल्या प्रकणी माननिय न्यायालयाने दिनांक 19/9/2018 रोजी फौजदरी प्रक्रीया संहीता 156 उप कलम 3 नूसार तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. आजतगायत 10 महीने झाले आहे तरी आरोपी विरोधात कोणतेत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. सदर प्रकरण गुन्हाचा तपास माननिय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिका-याकडे देण्यात यावे व निपक्षपाती पध्दतीने गुन्हाचा तपास करुन गुन्हेगारास शिक्षा मिळावी व गावा मध्ये ग्रामसभे द्वारे बाजार पेठेत उघड चौकशी करण्यात यावी, आरोपीस तात्काळ अटक करुन त्यांच्या विरोधात चारशिट माननिय न्यायालयात दाखल करण्यात यावी असे दिलेल्या निवेदणात नमुद केले आहे अदि मागण्या करीता संग्राम हायगले हे उपोषणास बसणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा