तासगाव!दि12 सावळज येथे वेद प्रकाशन कुर ता.भुदरगड जि. कोल्हापूर यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या वेद प्रज्ञाशोध परीक्षा सन 2018-19 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच सावळज येथे पार पडला.
वेद प्रकाशन यांच्या मार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सावळज येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बुद्ध विहारात घेण्यात आला. होनमोरे सर व कांबळे सर या परीक्षांची नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करत असून त्यांनीच या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी दिवाकर भिसे (जिल्हा उपाध्यक्ष RPI),बी. एस. पाटील(प्रगतशील बागायतदार सावळज),सदाशिव पवार (माजी चेअरमन सावळसिद्ध सोसायटी सावळज),बाळासाहेब जाधव(बागायतदार सावळज)रवींद्र शिंदे (माध्यमिक शिक्षक लिंगनूर)सदाशिव धेंडे (उपासक बुद्ध विहार सावळज) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष व सावळज भाग अवर्षणात असला तरी सावळज भाग गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कायमचा अग्रगण्य राहिलेला आहे ..असे मत दिवाकर भिसे यांनी व्यक्त केले.तसेच रवींद्र शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व स्पर्धा परीक्षेचे महत्व समजावून सांगितले
वेद प्रज्ञाशोध परीक्षेतील एकूण 62 गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड,प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात. आला यावेळी सावळज परिसरातील पालक शिक्षक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सुञसंचलन कांबळे सर यांनी केले तर होनमोरे सर यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा