नांदेड:(जाफर आदमपूरकर ) नांदेड शहरात महापरीक्षा, महापोर्टल विरोधात जनआक्रोश महामोर्चा लाखो सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींचा आज दि. १४ सप्टेंबर, २०१९ मोठ्या बेरोजगार संख्येने आयटीआयआयटीआय पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
सध्याची पोलीस भरतीची तुटपुंज्या जागांची जाहिरात रद्द करून तेरा हजार पदभरती करावी. महापरीक्षा महापोर्टल रद्द करून ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी. तलाठी व तत्सम पद भरतीची योग्य ती चौकशी करण्यात यावी. त्या त्या विभागात रिक्त असणाऱ्या जागा त्वरीत भरण्यात याव्यात अशा सर्व मागण्या घेऊन लांखोच्या संख्येने बेरोजगार तरूण- तरूणी रस्त्यावर उतरले होते.
'जुलमी जब जब जुल्म करेगा सत्ता के हत्यारों से,
चप्पा चप्पा गुंज ऊठेगा इन्कलाब के नारों से....!
-शहीद भगतसिंग
सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला गेला तर येणाऱ्या बेरोजगार मुलांचं तरी भविष्य सुखेनैव होईल. दिवसराञ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यासाठी हा आंदोलन समितीने घेतलेला निर्णय योग्यच असा आहे. कचखाऊ धोरण विद्यमान सरकार राबवून बेरोजगार मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. यांचे हे धोरण हाणून पाडण्यासाठी आज मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी झालेली होती. जनआक्रोश महामोर्चा आंदोलन समितीने मागण्यांचं निवेदन देऊन आणि भाषणे करून आपल्या हक्काची सरकारला जाणीव करून दिली.
शेवटी राष्ट्रगीताने महामोर्चाची सांगता झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा