१९ फेब्रुवारी २०२०

बिलोलीत बहुभाषीक पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती साजरी



बिलोलीः

      हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मराठवाडा बहुभाषीक पत्रकार महासंघ बिलोली यांच्या तर्फे बिलोली  तालुक्यातील  सनशाईन इंटरनॅशनल स्कुल कार्ला (खुर्द) बिलोली  येथे साजरी करण्यात आले.

बिलोली बहुभाषिक पत्रकार महासंघ तर्फे  आयोजीत शिवजन्मोत्सव साजरा बिलोली तालुक्यातील सनशाइन इंटरनॅशनल स्कूल येथे साजरा करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली नगरीच्या नगराध्यक्षा सौ. मैथीली संतोष कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन न.पा.उपाध्यक्ष मारोती पटाईत नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौंड,पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे ,कासराळीचे माजी सरपंच  अरविंद लक्ष्मण ठक्करवाड,कासराळीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुर्यकांत महाजन  मा.नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार,विद्यमान नगरसेवक अनुप अंकुशकर ,जावेद कुरेशी, बिलोली तालुका अध्यक्ष कॉग्रेस पार्टी  शिवाजी पाटील पांचपिपळीकर ,कार्ला (खूर्द) च्या महीला सरपंच सौ.अल्का देशमुख या मान्यावरांची  प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यावरांचे  हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .या शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रमुख वक्ते  प्रा.डॉ.सिध्दोधन कांबळे प्रसिद्ध विचारवंत व जामा मजिद चे मौलाना अहमद बेग इनामदार यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास काय ते आपल्या व्याख्यानातुन स्पष्ठ केले हिंदवी स्वराज्याचे जनक शिवाजी महाराज यांच्या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले या प्रमुख वक्तांनी आपल्या भाषनातुन  केले
यावेळी सनशाइन इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज यांच्या जिवनातील काही अमूल्य  प्रसंग वेशभुषा परिधान करुन पथनाट्याच्या माध्यमातुन सादर केले छत्रपती  शिवाजी महाराजांनी शाहीस्तेखानाचा वध कश्या प्रकारे शिताफीने केला होता ते आदभुत दृश पथनाट्याच्या माध्यमातुन सादर केले
यावेळी सनशाइन इंटरनॅशनल स्कुल चे संचालक मेरगु व शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच पत्रकार प्रकाश पोवाडे दादाराव इंगळे,तालुका अध्यक्ष शेख सुलेमान,संदीप गायकवाड, शेख ईलीयास, सय्यद रियाज, मार्तंड जेठे सुनिल कदम मारोती भालेराव आदी पत्रकार उपस्थित होते शाळेतील विद्यार्थी यांचे पालक देखील या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली
आयोजीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी मराठवाडा बहुभाषीक पत्रकार महासंघाचे अध्यक्ष शेख फारुख उपाध्यक्ष शेख युनुस संघाचे सचिव सतीश बळवंतकर सदस्य माधव दंतापल्ले,नागोराव कुड़के, हाई पटेल,शेख माजीद तर सनशाइन स्कूलचे संचालक सत्यनारायण मेरगु,मुख्याध्यापिका प्रेमा मेरगु,शिक्षक अनिल तमलुरे, ईमरान देसाई,भारत उषाया, परवीन,टी.वसंता, टी.विद्या,टी.मनीषा,अर्जुन सर,पांचाळ,रुपाली,सविता,सुविधा,रेणुका आदीनी परीक्ष्रम घेतले वेळी सूत्रसंचालन समतादुत शेख ईरशाद यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष शेख फारुख अहेमद यांनी  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...