बिलोली : माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनानिमित्त १२ मार्च हा दिवस "समता दिन "म्हणून साजरा करण्यात येतो .त्या अनुषंगाने १२ मार्च रोजी निवासी मूकबधिर विद्यालय रवींद्र नगर बिलोली येथे बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांच्या वतीने "समता दिन" साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले .यावेळी बहुभाषिक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शेख फारुख अहेमद यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जामा मशिदीचे मौलाना अहेमद बेग इनामदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .व सोबतच तालुका समतादूत शेख आय.एम.यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक ठकूरवाड बी.व्ही.,पाटील ए.जि.व स्वयंपाकी शेख फरहान सलीम व मदतनीस बंडेवार बी.एल.यांनी परिश्रम घेतले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा