कुंडलवाडी (मो.अफजल) पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवल सूक्ष्म -पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या हेतुने पथविक्रेत्यांना विशेष सूक्ष्म-पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला असुन रु .१०,००० / ( अक्षरी रुपये दहा हजार ) पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज सदर योजनेमार्फत उपलब्ध केले जाणार आहे.सदरील योजनेचा लाभ घेण्याकरीता नगरपरिषदेचे शिफारस पत्राची आवश्यकता असुन त्याकरीता ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे.प्रथम शिफारसपत्र ऑनलाईन प्राप्त झाल्यावरच उर्वरीत सर्व.ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्याकरीता खालील अटी आहेत.पथविक्रेत्यानी आपला मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक केलेला असणे अनिवार्य आहे.तसेच पथविक्रेतेचा व्यवसाय हा नगरपरिषद कुंडलवाडी हद्दीतील असावा . सदर योजना दि.२४ मार्च २०२० पूर्वी पासून कुंडलवाडी शहरामध्ये पथविक्री करीत असलेल्या सर्व पात्र पथविक्रेत्याना लागू असेल - पथविक्रेत्यांनी नियमीत परतभेड़ केल्यास व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील.सदर योजनेमध्ये डिजीटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजीटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या पथविक्रेत्यांना कॅशबॅक सुविधा देण्यात येत आहे . -नागरी पथविक्रेते वर्षाच्या परतफड मुदतीसह रु.१०,००० / पर्यंतचे कर्ज घेण्यास व त्यांची दरमाह हफ्त्याने परतभेड़ करणारे पथविक्रेते वाढीव मयदिसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील . ऑनलाईन अर्ज भरणे व सविस्तर माहितीसाठी http : // pmsvanidhi.mohua.gov.in किंवा जवळच्या सेतू सुविधा सेंटर शी संपर्क साधावा.तसेच अधिक माहिती साठी दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ( DY NULM ) मदत कक्ष सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनंत कुडाळे,सामदाय संघटक शांताबाई शिंदे नगर परिषद कुंडलवाडी यांच्याशी संपर्क सादावे मो.095033 85721,+91 7030210106 तरी शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना लाभ घ्यावा असे अहवान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डाॅ.अरूणा कुडमूलवार,उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांनी केले आहे .
बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ
संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....! बालाजी बच्चेवार नायगाव विधानसभा गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!! मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा