कुंडलवाडी प्रतिनिधी (मो.अफजल)
कुंडलवाडी येथील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात विविध उपक्रम राबवून भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात व शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करीत साजरा करण्यात आले.
नगर परिषद कार्यालयात मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण नगराध्यक्षा डाॅ.सौ.अरूणा कुडमूलवार,उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,सर्व संन्मानीय नगरसेवक यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतीमेचे पुजन करून नगराध्यक्षा डाॅ.सौ.अरूणा कुडमूलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.तदनंतर पालीका कार्यालया समोर शासनाचा परिपत्रका अनव्य नगराध्यक्षा डाॅ.सौ.अरूणा कुडमूलवार,
उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,सपोउनी विशाल सुर्यवंशी सर्व संन्मानीय नगरसेवक/ नगरसेवीका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचा प्रतीमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात सपोनी.सुरेश मान्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी सपोउनी.विशाल सुर्यवंशी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सेवा सहकारी सोसायटी येथे प्रभारी चेअरमन सयाराम नरावाड व मॅनेजर रामराव रत्नागिरे व सन्मानिय संचालक यांच्या हस्ते.सोसायटीचे भाग्यविधाता माजी.आ. कै.जयराम अंबेकर यव महात्मागांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रभारी चेअरमन सयाराम नरावाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निरिक्षक लक्ष्मीकांत येपूरवार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतीमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद हायस्कूल येथे मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष मोहम्मद अफजल,सदस्य व सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी नगरसेवक तथा समिती सदस्य पंढरी पुपलवार,व्यंकट शिरामे,जेष्ठ शिक्षक बी.एच.रामोड,एस.डी कमठाणे सर,जी.के बोईनवाड सर,जियाओदीन ईरफान सर,जुबेर सर,अनवरी मॅडम,दिलशाद मॅडम,राजू बोधनकर,सवीता बोधनकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक देवीदास निरडवार शाळा.व्यवस्थापण समिती अध्यक्ष हणमंलू ईरलावार,सदस्य तीपणे,गंगाधर पोरडवार व सर्व शिक्षक आदींचा हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून मुख्याध्यापक देवीदास निरडवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा