बिलोली - खतगाव सारख्या ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील शिक्षकांचा मुलगा चि.ओमकार बालाजीराव पेटेकर हा नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत 620 मार्क घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण होत आहे. ओमकारला शिक्षणाबरोबरच चित्रकला,गायन, आणि बुद्धिबळ अशा विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा त्याला अभिरुची आहे.तो सलग तीन वेळेस विभागीय पातळीवर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत विविध पारितोषिक मिळवले.नायगाव येथील ब्लु बेल्स इंग्लिश स्कूलमधून इयत्ता दहावीच्या परीक्षेत 97 टक्के मार्क घेऊन नायगाव तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान त्याने मिळवला.तो सातत्य जिद्द् चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या मार्गावर आहे ओमकार हा प्रसिद्ध साहित्यिक,कवी,कथाकार,चित्रकार बालाजी पेटेकर यांचा तो मुलगा आहे. त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता पूर्णत्वास जाणार आहे.अशा गुणी होतकरू व चिकाटीने अभ्यास करणारा ओमकार विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे.आपल्या यशाचे श्रेय तो आपले आई वडिल व गुरुजनांना देतो.त्याने मिळवलेल्या यशाबद्दल राजकीय,सामाजिक,साहित्यिक,पत्रकार बंधू,मित्र परिवार व हितचिंतकांकडुन अभिनंदन होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा