स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संघटना शाखा बिलो़ली तर्फे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
बिलोली -स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संघटना शाखा बिलो़ली तर्फे दिनांक 1 रोजी रविवारी दुपारी 12वाजता जिल्हा युवा अध्यक्ष श्री लक्षमणराव विभूते यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिलोली तालुक्याचे नायब तहसीलदार तथा बिलो़ली नगर
पालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय श्री डॉ.गौंड साहेब, नायगाव तालुक्याचे महिला व बालविकास अधिकारी श्री राजुरे. एल. यम, जिल्हासचिव श्री शिवाजीराव पांगरीकर, युवासचिव श्री संदीप अवनुरे, जिल्हा कोअर कमिटीचे युवाध्यक्ष श्री बालाजी घुमलवाड, जिल्हा संघटक कानगुलवार हणमंत, सायलू पारावार, तालुका अध्यक्ष श्री बालाजी कुरणापल्ले, तालुका सचिव विठ्ठल राजुरे, तालुका युवाध्यक्ष अशोक तुमीदवार, मुर्ती कलाकार मिरदोडे हणमंत, नृसिंह बडुरकर, हणमंत पाशावार, बालाजी कानगुलवार,
डॉ मिरदोडे शंकर,गजानन मरकंटे, गंगाधर मरकंटे, राजेश गुरगुलवार, व इतर तालुक्यातील
समाज बांधव उपस्थित होते यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पुष्पहार घालुन त्यांचा गौरव करण्यात आला यापैकी
दहावी मध्ये कु सुरेखा राजू कानगुलवार -96%,वैष्णवी बालाजी कानगुलवार-88%,आकाश बालाजी पाशावार 88%,मनोज शंकर मिरदोडे -80%,तुमीदवार आदित्य श्यामराव-79%,बजरंग बाबु कुरणापल्ले -76%,शिवानी सायलु पाशावार -70%,मनोज देविदास शिरोळे -69%,लक्ष्मीकांत बाबु मरकंटे -67% तर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गजानन संजय तुमीदवार (Neet मध्ये554),मिरदोडे मोहिनी शंकर-74%,ज्ञानेश्वर धर्माजी राजेरुपेल्लू -72%,श्ववेता गंगाधर कानगुलवार -69% ,कुरणापल्ले जयश्री लक्ष्मण -68%,प्रफुल्ल सायलू पाशावार-65%इत्यादी
विध्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून व सर्वांना मास्क व सॅनिटाझर वाटप करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाकार्यध्यक्ष श्री कुरणापल्ले शंकर यांनी केले तर श्री विठ्ठल राजुरे यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा