नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (अलीम्को), जिल्हा प्रशासन नांदेड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने त्यावेळेसचे जिल्हाधिकारी अरून डोंगरे यांच्या पुढाकारातून दि १० डिसेंबर २०१९ ते दि २६ डिसेंबर २०१९ दरम्यान नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील १६ हि तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठी लाखों रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते,तसेच या शिबीरातील साहित्य हे तीन महिन्यांतच म्हणजे मार्च २०२० मध्येच भेटणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते त्यामुळे या शिबीरात जिल्हाभरातील जवळपास १५ हजारांच्या वर दिव्यांगांनी तपासणी केली होती परंतु मार्च महिण्यातच कोरोना महामारीमुळे टप्याटप्याने लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला होता तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी डोंगरे यांची हि बदली झाल्यामुळे तसेच वाटपाचा कार्यकाळ दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी डाॅ.विपीन ईटणकर यांची भेट घेऊन हे साहित्य त्वरीत वाटप करावे अशी मागणी केली असता सर्व साहित्य व उपकरणे आलेले आहेत आपण लवकरच वाटप करू असे आश्वासन जिल्हाधिकारी ईटणकर यांनी दिले होते परंतु आज पुर्ण एक वर्ष झाले तरी नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांना अद्याप एडिप योजणे अंतर्गत साहित्य वाटप करण्यात आले नाहीत याचाच विसर जिल्हा प्रशासनाला पडल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी हे साहित्य जिल्हा प्रशासनाने ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक दिव्यांग दिनी वाटप करावे असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ
संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....! बालाजी बच्चेवार नायगाव विधानसभा गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!! मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा