प्रशासकीय यंत्रणा संज्ज अठवडी बाजार बंद
कुंडलवाडी (मोहम्मद अफजल)
आज संपन्न होणा-या मराठवाडा (औरंगाबाद) पदवीधर मतदारसंघ आमदार निवड प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून येथील जिल्हा परिषद हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक 449 वर सी.सी.टी.व्ही काॅमेराचा नजरेत 474 मतदार मतदानाचा हक्क बजावणार तसेच 100% मतदान पारपडण्यासाठी प्रशासनाचा वतीने आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहे.
आज दि.१ डिसेंबर २०२० रोजी मराठवाडा (औरंगाबाद) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पारपाडणार येथील जिल्हा परिषद हायस्कूल बुथ क्र.449 मध्ये एकूण 474 मतदारा पैकी पुरूष मतदार 397 तर महिला मतदार 77 हे सकाळी 8=00 वाजेपासून सायंकाळी 5=00 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क सी.सी.टी.व्ही काॅमेराचा नजरेत मतदानाचा हक्क बजावणार बुथवर सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.संध्याकाळी येथील
मतदान केंद्रास बिलोली तालूक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार कैलास वाघमारे यांनी भेट देवून पाहाणी केली व उपस्थितीतांना योग्य सुचना दिल्या यावेळी केंद्रप्रमुख तथा बिलोली तहसील चे नायब तहसीलदार निलावाड उत्तम व त्यांचे सहकारी मरकंटे डी.आय.गागीलगे शिवराज,
कसलोड सर उपस्थित होते.या ठिकाणी सपोनी.सुरेश मान्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पोकाॅ चापलवार संजय,एन.एल.पी.सी.श्रीवासतव ए.पी.कडक बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा