भोकर - किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करुन आणि गावा गावातील रस्ते झाडून ज्या महापुरुषाने समाज जागृती करुन स्वच्छतेचा संदेश दिला व दगडापेक्षा आपल्या कर्मातच पुण्य आहे. हे ठसवुन सांगणार्या संत गाडगेबाबा महाराज यांची आज जयंती.
निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर जि.नांदेड येथे त्यांच्या प्रतिमेस डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी पुष्ष व हार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी डॉ संतोष अंगरवार, डॉ बाळासाहेब बि-हाडे, मनोज पांचाळ,अत्रिनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, शेख शाबेर, श्रीमती मंदा चव्हाण, श्रीमती वैशाली कुलकर्णी, श्रीमती ज्योती शेंडगे अधिपरीचारीका, विठ्ठल शेळके मल्हार मोरे, रावलोड गिरी औषध निर्माण अधिकारी, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, श्रीमती भालेराव, साईनाथ कराळे, सुरेश डुमलवाड, सुधाकर गंगातीर, संतोष रायझादे, धनश्याम कल्याणकर व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा