महाराष्ट्र राज्यातील दहा हजार डॉक्टरांना देणार ॲप्रनचे सुरक्षा कवच : आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी
सोलापूर : कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्थेचे सर्वांनीच कौतुक केले. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, महसुल प्रशासन यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था समोर आल्या. पण नित्यनेमाने महाराष्ट्रवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणारे खासगी डॉक्टर या प्रवाहात थोडे किनाऱ्यालाच होते. खरतरं कोरोनाच्या संकटात खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना अनेकवेळा धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. मात्र त्यावरही मात करत रुग्णसेवेचे काम राज्यातील डॉक्टर करत होते. त्यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त करण्याचे काम आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी केले आहे. आयुष भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करणारे डॉ.अमीर मुलाणी यांनी राज्यातील दहा हजार डॉक्टरांना कॉटनचे ऑपरेशन थिएटरमध्ये वापरले जातात असे ॲप्रन भेट म्हणून देणार असल्याचे सांगितले. नेहमी रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही कोरोनाबाबत सावधानता बाळगावी लागते. मात्र प्लास्टीकच्या पीपीई किटमध्ये दहाबारा तास या डॉक्टरांना थांबणे शक्य नाही. आपण तोंडाला मास्क लावल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येवू शकतो. मग जर कॉटनचा पूर्ण ॲप्रन डॉक्टरांना दिला तर त्यांना देखील कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करणे सोपे जाईल. हा विचार करुन मी ॲप्रन देण्याचा निर्णय घेतला आहे. असे पत्रकारांशी बोलताना डॉ.मुलाणी सांगत हो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा