नांदेड :- जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा करण्यात आला. यावेळी गणेश सातपुते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, अशोक शिंदे, राजप्पा बाबशेट्टे, रविंद्र तेलंगे,माधव वांगजे उपस्थित होते.
यावर्षीचे घोष वाक्य
" झिरो हिवताप रुग्ण, उद्दिष्टाकडे वाटचाल ".
जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्वस्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण आहे. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व ईतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने *२५ एप्रिल* हा दिवस *" जागतिक हिवताप दिन "* म्हणून घोषित केलेले आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने थोडक्यात पुढील प्रमाणे माहिती डॉ आकाश देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड यांनी दिली.
हिवताप या आजाराचा प्रसार अँनाफिलस डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा.भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी पाण्याच्या टाक्या, कालवे ईत्यादी मध्ये होते. या आजाराचे लक्षणे थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येवू शकतो, ताप नंतर घाम येवून अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात. या आजाराचे निदान हे प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करून करता येते. तात्काळ निदान पध्दती आर.डी.के. (Rapid Diagnostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्त नमुना घेऊन पी.एफ./ पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते. कोणताही ताप हा हिवताप असू शकतो. म्हणून प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्तनमुना नजिकच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासून घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळून आल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्विन व प्रायमाक्विन गोळयाचा औषधौपचार घ्यावा.मागील तिन वर्षात नांदेड जिल्ह्यातील हिवताप आजारिची परिस्थिती सन २०१८ मध्ये ४२६६८६ रक्तनमुने तपासले ४ पी.व्ही.रुग्ण, सन २०१९ मध्ये ४२८६२३ रक्तनमुने तपासले ३ पी.व्ही, सन २०२० मध्ये २७४१८३ रक्तनमुने तपासले २ पी.व्ही, मार्च-२१ अखेर ७४८१३ तपासले एक ही रुग्ण आढळून आला नाही.
भविष्यात हिवताप आजाराचे उद्रेक होवू नये म्हणून आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आलेले असून हिवताप आजारावर मात मिळवण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्याकरिता पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे.
*- प्रतिबंधात्मक उपाययोजना -*
१.आपल्या घराभोवताली पाणी साचू देऊ नका.
२. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करून रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरड्या करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.
३. आंगन व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
४. झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरून घेऊन झोपावे.
५. संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.
६. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारून घ्यावे.फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) करू नये.
७. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप , मडकी, ईत्यादी ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या व्हेट पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, तर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.
८. वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दुर ठेवील त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा