२९ एप्रिल २०२१

महाराष्ट्र नॅचरोपॅथी कौन्सिल स्थापनेसाठी आयुष भारत संघटनेचा पुढाकार

  


पुणे :  जुन्नर ओतूर येथे आयुष भारत संघटनेची मिटींग पार पडली. यावेळी बरेच डॉक्टर उपस्थित होते. सर्वसामान्य नॅचरोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी  त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी कॉन्सिल गठन होणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्रात पाच हजारांहून अधिक नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्या वरती आम्ही मुळची अन्याय होऊ देणार नाही असा इशारा ही देण्यात आला आहे. यापुढे जर नॅचरोपॅथी वरती बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आयुष भारत गप्प बसणार नाही आतापर्यंत आमच्या तोंडाला चिकटपट्टी लावून आम्ही गप बसलो होतो पण इथून पुढे जर चुकीच्या कारवाई केल्या तर आम्ही मुळीच गप्प बसणार नाही असे आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलानी बोलताना सांगत होते. त्या साठी आज रोज आयुष भारत कृती समिती स्थापन करण्यात आली असुन लवकरच केंद्रीय आयुष मंत्र्यांना कृति समिति भेट देणार आहे तसेच लवकरात लवकर निर्णय न झाल्यास 
देश भर आंदोलन करण्याचा इशारा आयुष भारत ने पञकारांशी बोलताना दिला आहे.
यावेळी आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अमिर मुलानी व डॉ. विश्वास फापाळे तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. फैजान इनामदार व महाराष्ट्र राज्य नॅचरोपॅथी अध्यक्ष जलील शेख, नैचरोपथी महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. तनवीर देशमुख,  योगेश फापाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...