बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल संपूर्ण देवगिरी प्रांतात प्रसिद्ध असलेल्या संस्कृती संवर्धन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रमोदजी देशमुख आणि अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक तसेच पानसरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. गोपाळराव चौधरी यांना बिलोली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत.
प्रमोद देशमुख यांची विविध क्षेत्रात असलेले कार्य शैक्षणिक, सामाजिक व गोरगरिबांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून त्यांना एका वेगळ्या वाटेवर आणून तसेच पाणी संवर्धन, वृक्षवल्ली विविध साहित्य संमेलने, शिबिरे, व्याख्याने अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले प्रमोद देशमुख यांना तसेच प्रा.डॉ. गोपाळ चौधरी यांनी बिलोली येथे कीर्तन महोत्सव, लावणी महोत्सव, एकांकिका महोत्सव, लोककला महोत्सव, साहित्य संमेलन ,कवी संमेलन , व्याख्यानमाला विविध शिबिरे यातून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करून समाजामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे मोलाचे कार्य केल्याबद्दल तसेच विविध क्षेत्रात सूत्रसंचालनाच्या माध्यमातून व्याख्यानाचे व भाषणाचे द्वारे सतत वावर असणारे तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य असणारे पानसरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मराठी विषयाचे उत्कृष्ट प्राध्यापक प्रा. डॉ. गोपाळ चौधरी यांना बिलोली नगरीचे भूमिपुत्र तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त महालेखा वित्त अधिकारी बी.पी. नरोड यांचे मार्गदर्शनाखाली गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ बिलोलीच्या वतीने यापूर्वीच अनेक मान्यवरांना बिलोली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलाकार बिलोलीचे भूमिपुत्र दिलीप खंडेराय,डॉ भीमराव अंकुशकर, अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र बिलोलीकर अशा अनेक कला, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय इत्यादी क्षेत्रातील एकूण तेरा मान्यवरांना बिलोली भूषण पुरस्कार जाहीर झालेले आहेत. या पुरस्काराचे नियोजन व आयोजन काही दिवसात बिलोली येथे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते संपन्न होणार आहे.सदर आयोजन हे रवींद्र नगर येथील मूकबधिर विद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणार आहे. असे गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री बी.पी. नरोड यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसे पहिले तर श्री बी.पी. नरोड यांनी बिलोलीत टँकरद्वारे गरजवंतांपर्यंत पाणी वाटप तसेच विविध मोफत वैद्यकीय शिबीर रवींद्र नगर येथे नमस्ते बिलोली किचन सेंटर व उद्योग सेंटरचे उद्घाटन झालेले आहे. ज्याद्वारे बिलोली तालुक्यातील बचत गटाच्या विविध महिलांसाठी व त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून सदर लघुउद्योग सुरू करण्यात आलेले आहेत. बिलोली भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तेरा मान्यवरांची तसेच शिक्षण महर्षी प्रमोदजी देशमुख प्रा.डॉ.गोपाळ चौधरी, डॉ. रवींद्र बिलोलीकर, डॉ. भीमराव अंकुशकर ,दिलीप खंडेराय इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन आणि कौतुक सर्व क्षेत्रातून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा