पिक अनुदान रक्कम तात्काळ शेतक-यांच्या नावे जमा करा अन्यथा २आँक्टोंबर रोजी उपोषण नांदेड / बिलोली ता.प्र. खरिप पिक हंगाम सन २०१६ मध्ये अतिवृष्टि व अवेळी पाउस यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्याआनुशंगान्वे शासनाच्या वतिने तालुक्यातील पिक विमा वंचित शेतक-यांना शासकिय अनुदानाची रक्कम वितरण करण्यासाठी जवळपास आठरा कोटि आठ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आसुन सदरील अनुदानीत रक्कम शेतक-यांच्या बंँक खात्यात तात्काळ वर्ग होणे अपेक्षित होते. पण या बाबत संबधीता कडुन अद्यापही कार्यवाही दिसुन येत नसल्याने अनेक शेतक-यांनी या बाबत तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे चकरा मारुन देखिल विविध कारणे समोर करुन वेळ मारुन नेत आसल्याने या बाबत तालुक्यातील शेतक-यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे . जवळपास आडीच ते तिन महिन्यापुर्वी प्राप्त झालेला अनुदानीत रक्कमेचा निधी शेतक-यांच्या बँक खात्यात तात्काळ वर्ग करण्यात यावे या संदर्भात संबधीत तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी होत आसताना...