२५ सप्टेंबर २०१८

पिक अनुदान रक्कम तात्काळ शेतक-यांच्या नावे जमा करा

 अन्यथा २आँक्टोंबर रोजी उपोषण
 

नांदेड / बिलोली ता.प्र.
खरिप पिक हंगाम सन २०१६ मध्ये अतिवृष्टि व अवेळी पाउस यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्याआनुशंगान्वे शासनाच्या वतिने तालुक्यातील पिक विमा वंचित  शेतक-यांना शासकिय  अनुदानाची रक्कम वितरण करण्यासाठी जवळपास आठरा  कोटि आठ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आसुन सदरील अनुदानीत रक्कम शेतक-यांच्या बंँक खात्यात तात्काळ  वर्ग होणे अपेक्षित होते. पण या बाबत संबधीता कडुन अद्यापही कार्यवाही दिसुन येत नसल्याने   अनेक शेतक-यांनी या बाबत तहसिलदार  व तालुका  कृषी अधिकारी यांच्याकडे  चकरा मारुन देखिल विविध कारणे समोर करुन वेळ मारुन नेत आसल्याने या बाबत तालुक्यातील  शेतक-यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे . जवळपास आडीच ते तिन महिन्यापुर्वी प्राप्त झालेला  अनुदानीत रक्कमेचा निधी शेतक-यांच्या बँक खात्यात तात्काळ वर्ग करण्यात यावे या संदर्भात संबधीत तहसिलदार व तालुका  कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी होत आसताना या विषयाला  संबधीताकडुन टाळाटाळ होत आसल्याचे दिसुन येत आहे.करिता सदरची अनुदानीत  रक्कम  संबधीत लाभार्थी शेतक-यांच्या बंँक खात्यात तात्काळ वर्ग करण्यात यावे अन्यथा महात्मा गांधी जयंती दिनी दि.२ आक्टोंबर रोजी तहसिल  कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा ईशारा राजु पाटिल शिंपाळकर ,मोहन पा.जाधव बडुरकर ,वसंतराव जाधव,बाबुराव गोसलोड सरपंच लघुळ ,नागनाथ गोजे सावळीकर ,आनंदराव पाटिल कोळगाव ,गजानन शेळके कार्ला खु,मनोहर वसमते ,बालाजी संभाजी हिवराळे यानी  दि.२४ सप्टेंबर रोजी तहसिलदार याना एका निवेदनद्वारे इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...