27 नोव्हेबर ते दि.31 नोव्हेबर पर्यत राबविणार मोहिम.
बिलोली:आरोग्य विभागा अंतर्गत राबविणयात येणाऱ्या गोवर रूबेला लसिकरणाची मोहिमेचा शुभांरभ आज दि.27 नोव्हेबर 2018 रोजी बिलोली नगर पालिकेच्या अध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व उपाध्यक्ष मारोती पटाईत यांचा हस्ते उदघाटन करण्यात आला.
भारत सरकार आरोग्य विभागा मार्फ़त राबविन्यात येणाऱ्या 'गोवर रूबेला 'मोहिमेची आज दि.27 नोव्हे. पासुन सुरूवात झाली ग्रामीण रुग्णालय बिलोली मार्फत गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभांरभ बिलोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व उपाध्यक्ष मारोती पटाईत यांच्या हस्ते बिलोली येथील कन्या प्राथमिक शाळा यांच्या हस्ते उदघाटक व धन्वंतरीचे पूजन करून गोवर रूबेला लसिकरणाचा मोहिमेची सुरवात करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी गोवर हा संसर्गजन्य आजार असून मुलामध्ये मृत्यु तसेच अपंगतत्व आणारा आजार आहे रूबेलामुळे स्त्रिया माध्ये गर्भधारणा राहत नाही राहिला तर गर्भपात होतो व गर्भपात झाला नाही तर जन्माला येणारी मुले मृत किंवा अपंगतत्व अवस्थेत जन्माला येवू शकतात गोवर रूबेला हा विषाणुमुळे होणारा आजार आहे. 9 महीने ते 15 वर्षापर्यत चा सर्व बालकांना आवश्य लस देण्याचा आव्हान केले.यावेळी प्रमुख पाहुणे गटशिक्षणधिकारी ए. व्ही. कुलकर्णी,पोलीस निरीक्षक भगवान धबड़गे,सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे,नगर सेवक अरुण उप्पलवार,प्रकाश पोवाड़े,जावेद क़ुरैशी,नितिन देशमुख,सुरेश शिवलाड,आनंद गुडमलवार, हाई पटेल,पत्रकार राजेंद्र कांबळे, रत्नाकर जाधव,विट्टल चंदनकर,फारुख अहेमद,शेख इलियास सह ग्रामीण रुग्णालयचे डॉ. सतीश तोटावार,डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार,डॉ. विलास मुसळे,डॉ. एस. गव्हाने, विनोद बोधगिरे,सोहेल आदिची उपस्थित होती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा