१९ नोव्हेंबर २०१८

बिलोलीत महाराष्ट्र  ग्रामीण बँकेचे  ए.टी.एम. सुरु करा -  नगर सेवक जावेद कुरेशी 



बिलोली -  महाराष्ट्र  ग्रामीण बँकेचे ए.टी.एम. मशीन  सुरुवात करावी अशी मागणी नगरपालीके चे नगरसेवक जावेद कुरेशी व नागरीकानी
 केलीआहे.बिलोली शहर  हे तालुक्याचे ठिकाण आसुन  एस. बी.आय.चे एकच ए.टी,एम. मशीन आहे.  ते अपुरे आसुन वारवार नादुरुस्त पडते. एकदा नादुरुस्त झाले की  दहा ते पंधरा  दिवस दुरुस्त केले जात नाही. त्यामुळे  व्यापारी नागरीक  आधिकारी  कर्मचारी  आदिना  अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.ऐन दिवाळी सणात  देखील एस.बी.आय. चे ए.टी.एम. मशीन बंद पडले. कुलुप लावण्यात आले. त्यामुळे खातेदाराना दिवाळीत पैसे काढण्यासाठी   नादेड ,बोधन , नरसी , नायगाव ,देगलुरला जावे लागले. एकच ए.टी.एम. मशीन आसल्याने रेशन दुकाना प्रमाणे रागेत तासनतास उभे रहावे लागते. आपले पैसे आपल्याला वेळे वर मिळत नाही.बिलोली हे शहर तेलगंणा महाराष्ट्र  सिमेवर  राज्य रस्त्यावर असल्याने सतत  प्रवाशाची ये जा चालु असते. येथे  न्यायालय तहसिल नगरपालीका शाळा
 सार्वनिक बाधकाम , पोलीस ठाणे आशी विविध  अनेक कार्यालय कार्यरत आहेत. आर्थीक व्यहारासाठी मोठ्या प्रमाणात आडचणी येत असल्यामुळे  येथे महाराष्ट्र  बँक  ने ए.टी.एम. मशीन  सुरु करण्यात यावे. असे निवेदन  नगरसेवक  जावेद कुरेशी व सरफराज फारुखी यांनी  शाखाधिकारी देशमुख याना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...