पञकार फारुखी यांना ऐजेएफसीचा राज्यस्तरीय पञकार प्रेरणा पुरस्कार प्रदान
बिलोली - ( ता.प्र. ) राज्यातल्या निवडक 17 पञकांरांना ऐजेएफसीने देऊ केलेल्या पुरस्काराने बिलोली येथील पञकार वलिओद्दीन फारुखी यांचाही समावेश असुन नुकताच चिपळुणात फारुखी यांना राज्य पुनर्वसन प्राधिकरण चे उपाध्यक्ष ( राज्यमंञी दर्जा ) तथा भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते रत्नागिरी चे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत पञकार प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथे आॕल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल चे तेरावे राज्यस्तरीय पञकार संमेलन दि. 13 व 14 नोव्हेंबर रोजी पार पडले. या संमेलनाला राज्यभरातल्या मुद्रीत , श्राव्य , दृकश्राव्य माध्यमांचे पाचशेहुन अधिक पञकार सहभागी झाले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सकाळ मिडीया चे मल्हार अरणकल्ले होते. संमेलन दोन दिवस चालले असले तरी शेवटच्या दिवशी तीन सञात संमेलन संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन रत्नागिरी चे पालकमंञी ना. रविंद्र वायकर यांच्या हस्ते तर खा.विनायक राऊत , चिपळुणचे आमदार सदानंद चव्हाण , भाजपाचे आ. प्रसाद लाड , नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या उपस्थितीत झाले. तदनंतर विश्वास मेहेंदळे यांच्या अध्यक्ष ते खाली झालेल्या परीसंवादात एबीपी माझाचे निवेदक प्रसन्न जोशी , समीरण वाळवेकर , जयु भाटकर , नितीन केळकर , जतीन देसाई , शिवसेनेच्या उपनेत्या आ. मृणालताई गोरे सहभागी झाल्या होत्या. समारोपापुर्वी राज्यातल्या उल्लेखनीय कार्य व योगदान दिलेल्या पुरस्कार प्राप्त पञकारांचा भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी , विश्वास मेहेंदळे , मल्हार अरणकल्ले यांच्या हस्ते बिलोलीचे पञकार वलिओद्दीन फारुखी यांना स्मृती चिन्ह , प्रमाणपञ व पुस्तके देऊन सन्मानित करण्यातआला आहे. या राज्यस्तरीय संमेलनास ऐजेएफसीचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल , उपाध्यक्ष नितीन भगवान , केंद्रीय सरचिटणीस अतुल होनकळसे , राज्याध्यक्ष विकास कुलकर्णी केंद्रीय खजिनदार राजेंद्र शिंदे , प्रदेश कार्याध्यक्ष सतीश कदम , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मकरंद भागवत आदि उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा