१९ नोव्हेंबर २०१८

बिलोली पञकार संघाच्या वतीने राजेश गंगमवार यांना श्रद्धांजली



  बिलोली येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी कै.राजेश गंगमवार यांच्या अकाली झालेल्या दुखद निधनामुळे बिलोली तालुक्यातील वृत्तपञ क्षेञावर शोककळा पसरली.गंगमवार यांच्या निधनाबद्दल बिलोली येथील तानुबाई सावळे पञकार प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतीने दि.१८ नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
    शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमात पञकार गोविंद मुंडकर,माजी सनदी अधिकारी व्ही.जे वरवंटकर,म.रा.मराठी पञकार संघाचे अध्यक्ष राजू पा.शिंदे,तानुबाई सावळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वल्लीयोद्दीन फारूखी यांनी कै.राजेश गंगमवार यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी माजी गट शिक्षण अधिकारी नामदेवराव सुर्यवंशी,पञकार गंगाधर कुडके ,सय्यद रियाज ,गौतम लंके,शेख इलीयास,मार्तंड जेठे,माचलोड,देशाई चिटमोगरेकर,भास्कर कुडके यांच्यासह अनेक पञकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...