बिलोली ता.प्र.
तालुक्यातील सन२०१६ या वर्षातील खरीप हंगाम पिक विमा वंचित शेतक-यांसाठी राज्य शासनाकडुन अनुदानापोटी प्राप्त झालेली रक्कम वाटपासाठी तहसिल प्रशासनाकडुन दिरंगाई होत आसल्याने ती अनुदानीत रक्कम तात्काळ वाटप करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी राजु पाटिल यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी विविध चळवळीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाच्या पाठपुराव्यास अखेर यश प्राप्त झाले आसुन सदरील अनुदानीत रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग करण्यात आल्याने त्या आंदोलनकर्त्यांच्या प्रयत्नास अखेर यश आल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गातुन अभिनंदन होत आहे.
सन २०१६ मध्ये जुन ते आँक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टित खरीप हंगामातील सोयाबिन , उडिद व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या दरम्यान झालेल्या नुकसान भरपाई पोटि पिक विमा प्राप्त लाभार्थी शेतक-यांना प्रधानमंञी पिक विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई देण्यात आली.पण सदरील विम्यापासुन वंचित आशा शेतक-यांसाठी शासनाकडुन अनुदान जाहिर करण्यात आले होते.ती अनुदानीत रक्कम त्या लाभार्थी शेतक-यांना वाटप करण्यासाठी गेल्या पाच महिन्यापुर्वी तहसिल प्रशासनाकडे १८ कोटी ८ लक्ष ३५ हजार ९०० रुपये तहसिल प्रशासनाकडे प्राप्त झालेले आसताना देखिल ती अनुदानीत रक्कम शेतक-यांना वाटप करण्यासाठी होत आसलेले विलंबन लक्षात घेउन अखिल भारतिय भ्रष्टाचार निर्मुलन समीतीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटिल शिंदे शिंपाळकर यांच्या नेतृत्वाखाली गोविंद मुंडकर मोहन जाधव ,वसंतराव जाधव,नागनाथ गोजे यांच्या सहकार्याने अनेक शेतक-यांनी दि.२ आँक्टोबर रोजी तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषण केले.व तदनंतर १५ आँक्टोबर रोजी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून चळवळळ चालु करण्यात आली. सदरील आंदोलना दरम्यान तहसिल प्रशासनाच्या वतिने दिलेल्या लेखी आश्वासनाच्या धर्तीवर राजु पाटिल व आंदोलनकर्ते यानी तहसिल प्रशासनाकडे प्रलंबित अनुदानाचा प्रश्न सततचा लावुन धरलेल्या पाठपुराव्यामुळे आज दि. २७ नोव्हेंबर रोजी ९२ गावा पैकी ४५ गावच्या पाञ लाभार्थी शेतक-यांची यादि बँकेकडे वर्ग करण्यात आले. यात प्रामुख्याने मौ.कार्लाखु.,गंजगाव,वलियाबाद,लघुळ,चिंचाळा,कासराळी ,बेळकोणी बु,बेळकोणी खु.माचनुर ,नागनी ,दौलापुर,हरनाळी,मलकापुर,ममदापुर,अजिजाबाद,काराळा,गुजरी,कांगठी,खपराळा,कोळगाव,आळंदि,बोरगावथडी,मुतन्याळ,जलालपुर,केसराळी,रामपुर थडी ,हिप्परगा थडी,शिंपाळा ,बिजुर ,दुगाव,तोरणा, मिनकी ,सगरोळी ,दौलतापुर ,रामपुर म. बिलोली , दगडापुर ,कौठा ,आईनापुर ,मुखेड बे.देवापुर बे.कोल्हेबोरगाव ,गागलेगाव,कुंभरगाव ,डौर, आदि ४५ गावातील एकुण १३६७७ लाभार्थी शेतक-यांचा समावेश आसुन सात कोटी ब्याऐंशी लक्ष आकरा हजार नऊशे बावीस रु.अनुदानीत रक्कम बिलोली येथिल नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग करण्यात आले.तर उर्वरीत गावच्या लाभार्थी शेतक-यांच्या अनुदान पाञ यादया पण तात्काळ बँकेत वर्ग करणार आसल्याचे तहसिलदार विक्रम राजपुत यांनी सांगीतले. सततच्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित आसलेले अनुदान वाटप करण्यासाठी राजु पाटिल यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतक-यांनी सहभागी होउन चळवळ चालु करुन अखेर यश प्राप्त झाल्याने शेतक-यां मध्ये आनंद होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा