बिलोली
येथील नगर परिषदेच्या वतीने नवीन बस स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या २८ गाळ्यांच्या पुर्वीच्या लिलाव त भाग घेऊनही काही व्यापाऱ्यांनी अनामत रक्कम भरली नव्हती.अशा उर्वरीत व्यापारी संकुलातील १२गाळ्यांचा दि.३० नोव्हेंबर रोजी लिलाव करण्यात आला.
नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव गत दिड वर्षा पुर्वी या ना त्या कारणाने होत नव्हता.दरम्यान शहरातील काही नागरिकांनी एकत्र येऊन उभारलेली व्यापारी संकुल कशासाठी ? ही चळवळ या चळवळीचे प्रमुख गोविंद मुंडकर यांनी जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी व नगर परिषद प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सय्यद रियाज यांनी वृत्तांत प्रसारित केल्या मुळेt२१ सप्टेंबर रोजी २८ गाळ्यांचा जाहिर लिलाव करण्यात आला होता.या लिलावात शहर व परिसरातील व्यापाऱ्यांनी भाग घेऊन बोली लावण्यात चढाओढ केली होती.माञ दि.२१ रोजी झालेल्या लिलावात बोली लाऊनही केवळ १४ व्यापाऱ्यांनीच बोली प्रमाणे अनामत रक्कम वेळेत न.पा कडे भरली होती.त्यामुळे उर्वरीत गाळ्यांचा परत दि.३० नोव्हेंबर रोजी जाहिर लिलाव करण्यात आला.या लिलावात भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांपैकी उमेश बिलोलीकर यांनी गाळा क्र.७ साठी ४ लक्ष ९० हजार रूपये,सुजाता विठ्ठल कोत्तावार यांनी गाळा क्र.८ साठी ५ लक्ष २५ हजार,गाळा क्र.९ साठी शेख लतीफ यांनी ३ लक्ष ८० हजार,गाळा क्र.१० साठी भागवत लोकमनवार यांनी ३ लक्ष ८५ हजार,गाळा क्र.११ साठी मनोज शंखपाळे यांनी ३ लक्ष ५५ हजार,गाळा क्र १३ साठी सत्यजित तुप्पेवार यांनी ३ लक्ष १५ हजार,गाळा क्र १५ साठी ञ्यंबक पाटील यांनी ३ लक्ष ४५ हजार,गाळा क्र १६ संजय पाटील ४ लक्ष ५ हजार,गाळा क्र २५ विरनंद हायगल्ले यांनी ३ लक्ष ६५ हजार ,गाळा क्र २६ साठी संग्राम हायगल्ले यांनी ४ लक्ष ५ हजार,गाळा क्र २७ साठी संतोष पाटील यांनी ४ लक्ष व गाळा क्र २८ साठी किशन पुजलवार यांनी ४ लक्ष १५ हजार एवढी सर्वोच्च बोली लावली.तर गाळा क्र.३ चा लिलाव होऊ शकला नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा